पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील अनागोंदी कारभारा प्रकरणी आरोग्य समितीत हल्ला बोल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील अनागोंदी कारभारा प्रकरणी आरोग्य समितीत हल्ला बोल

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयाबाबतच्या अनागोंदी कारभारा पकरणी पालिका आरोग्य समिती मध्ये चांगलेच आज पडसाद उमटले. शिवसेना नगरसेविका डॉ अनुराधा पेडणेकर यांनी आरोग्य समितीत  प्रशासनावर हल्लाबोल केला. अनेक गैरकृत्य समोर आणली आणि पशासनाला धारेवर धरले. अखेर आरोग्य समिती अध्यक्षा अनिता यादव यांनी सदर रुग्णालयात अचानक भेट देऊन वर-तुरि-थतीची पाहणी केली जाईल असा इशारा त्यांनी पालिकेला दिला. 

शिवडी टी बी रुग्णालयातील कमॅचा-यांसाठी देण्यात आलेल्या पालिका व-वाटसॅ अनधिकृतपणे  भाड्याने देत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. तसेच येथील रुग्णांस जी टी र - कॅन, एनआरआय चाचणीसाठी इतर पालिका रुग्णालयात पाठविण्याऐवजी परळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात असून त्यातून टक्के वारी मिळविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गरीब रुग्णांसाठी औषधे उपलब्ध असताना ही विव-की  केमिस्ट्र या खासगी मेडिकलमधून औषधे  आणायला सांगून नाडले जात आहे.तर सन 2012 पासून एकाच कंत्राटदारांकडून येथे दुरुस्ती ची कामे सुरू असून मॅकनिकल कामाच्या नावावर सिव्हिल कामे केली जात आहेत ही कामे ही निकृष्ठ दर्जाची असून या सर्व आरोपाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी डॉ पेडणेकर यांनी यावेळी केली या चचेॅत राराष्टवादीच्या सदस्या सईदा खान , शितल म्हात्रे, यांनी भाग घेवून या आरोपाना पुष्टी  दिली. या रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक ननावरे यांची नियुक्ती नियम बाहय असून त्यांनी एमपीएससीला  खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला .यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करावीत  अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages