मुंबई : महानगरपालिका शाळांचे नूतनीकरण झाले, पण त्याभोवती असलेली संरक्षक भिंत धोकादायक अवस्थेत आहेत, 'घर नवीन बांधता मग त्याची दार मात्र मोडकी का?' असा सवाल करून पालिका शाळांच्या सभोवतालच्या संरक्षक भिंती त्वरित बांधाव्यात अशी मागणी नगरसेविका राजश्री शिरवडकर, शीतल म्हात्रे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत करत पालिका शिक्षण विभागाला धारेवर धरले.
दहिसर पश्चिम येथे सखाराम तरे मार्गावर असलेल्या तरे मार्ग शाळेचे गेल्या दीड वर्षांत लाखो रुपये खचरून नूतनीकरण झाले आहे. या शाळेत मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांचे वर्ग भरतात. गेल्या वर्षीच या शाळेचे नूतनीकरण झाले, मात्र संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली नाही, नूतनीकरणाच्या कामात संरक्षक भिंतीची दुरुस्ती का केली नाही, शाळेच्या मैदानात माती असते, पण तेथे बसवलेल्या लाद्यांचे तुकडे झाले असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायांना इजा होत आहे, असे त्या म्हणाल्या.
शाळेभोवती असलेली संरक्षक भिंत पडून, त्यात कोणीही शालेय विद्यार्थी जखमी झाल्यास त्याला शिक्षण विभागाचे अधिकारी कांबळे हेच जबाबदार असतील, असे म्हात्रे यांनी निक्षून सांगितले. संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम लवकर केले जाईल, असे कांबळे म्हणाले. तत्पूर्वी, भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर यांनी शिवसेनेच्या प्राजक्ता सावंत यांच्या हरकतीच्या मुद्याला पाठिंबा देताना, त्यांच्या कार्यालयासमोरील शाळेतील सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे. शाळेची सुरक्षा यामुळे धोक्यात आली आहे, असे सांगितले.
शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनीही त्यांच्या विभागातील बीपीटी शाळेची दुरवस्था विषद केली व या शाळेचा ताबा एका स्वातंत्र्यसैनिकांनी घेतला असताना पालिकेचे स्थानिक विभाग अधिकारी काहीच करत नाहीत, असे सांगितले. शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी हरकतीच्या मुद्यावरील निर्णय राखून ठेवला.