१ मेपासून लँडलाईनचे रात्रीचे कॉल मोफत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१ मेपासून लँडलाईनचे रात्रीचे कॉल मोफत

Share This
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिफोन कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड'ने (बीएसएनएल) आपल्या लँडलाईन फोन व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळेत फिक्स्ड फोनवरून मोबाइल फोनसहित कोणत्याही दूरसंचार नेटवर्कवर अर्मयाद संख्येने मोफत कॉल करण्याची सुविधा देण्याची घोषणा गुरुवारी केली. ही सुविधा १ मे पासून लागू होणार आहे.

या योजनेअंतर्गत बीएसएनएलच्या फिक्स्ड लाईनवरून १ मे पासून रात्रीच्या वेळी देशात कोठेही मोबाइल फोनसह कोणत्याही ऑपरेटरच्या नेटवर्कवर अर्मयाद मोफत फोन कॉल करता येणार आहेत. ही योजना रात्री ९ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे आणि यात सर्व कनेक्शन्सचा समावेश असणार आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व प्रमुख लँडलाईन सामान्य योजना, लँडलाईन विशेष योजनांसोबतच प्रमुख काम्बो (ब्रॉडबँडसोबत लँडलाइन) योजनांचाही यात समावेश आहे. दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या ताज्या आकडेवारीनुसार लँडलाईन बाजारात मजबूत स्थिती ठेवणार्‍या बीएसएनएलच्या ग्राहकांनी फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक फिक्स्ड लाईनची विक्री केलेली आहे, तर दुसरीकडे एअरटेल सर्वात फायद्यात राहिली. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कंपनीच्या लँडलाईन ग्राहकांची संख्या १.६६ कोटीपेक्षा अधिक होती. फेब्रुवारीत १,६२,५५६ लँडलाईन कनेक्शन विकल्यानंतरही कंपनी ६२.२६ टक्केच्या भागिदारीसह लँडलाईन फोन विभागात मजबूत स्थिती बनलेली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages