मुंबई : बेस्टने बसभाडेवाढ केल्या नंतर त्याचा चांगलाच फटका बेस्ट उपक्रमाला बसला आहे. बेस्टचे दररोजचे प्रवासी तब्बल २ लाख १५ हजारांनी घटले आहेत, मात्र भाडेवाढीमुळे मिळणाऱ्या जास्त उत्पन्नामुळे बेस्टच्या तिजोरीत सुमारे ३८ लाख रुपयांची कमाई वाढली आहे.
बेस्ट उपक्रमाने बसभाडेवाढ करताच त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे. बसची भाडेवाढ झाल्याने बेस्टच्या प्रवाशांनी पुन्हा रिक्षा व टॅक्सीने प्रवास करण्यास पसंती दिली आहे, पण भाडेवाढीमुळे बेस्टच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. जानेवारीत बेस्टचे ३५ लाख प्रवासी होते, पण भाडेवाढ होताच प्रवासी संख्या दोन लाख १५ हजारांनी घटून ३३ लाखांवर घसरली आहे. प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी, बेस्टच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारीत बेस्टला ३५0.८८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते पण फेब्रुवारीत त्यात वाढ होऊन ही कमाई ३८८.८३ लाख रुपये झाली आहे. बसभाडेवाढ झाल्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येत घट होणे अपेक्षितच होते, अशी प्रतिक्रिया बेस्ट समितीमधील काँग्रेसचे सदस्य शिवजी सिंह यांनी व्यक्त केली. बेस्टला तोट्यातून काढण्यासाठी महापालिकेतील सत्तारुढ शिवसेना-भाजप युती काहीच ठोस प्रयत्न करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.