अपंग व्यक्तींच्या मृत्यू पश्चात दूरध्वनी केंद्राचे अनुज्ञापन पत्र वारसांच्या नावे होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अपंग व्यक्तींच्या मृत्यू पश्चात दूरध्वनी केंद्राचे अनुज्ञापन पत्र वारसांच्या नावे होणार

Share This
मुंबई, दि .12 (प्रतिनिधी) अपंग व्यक्तींच्या नावे  असलेल्या दूरध्वनी केंद्राचे अनुज्ञापन पत्र त्यांच्या मृत्यू पश्चात  त्यांच्या कायदेशीर वारसांच्या अथवा पत्नीच्या , पतीच्या नावे हर-तांतरित लवकरच  करण्यात येणार आहे तशी ठरावाची सूचना पालिका सभागृहासभागृहाने एक मताने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता पालिका प्रशासन लवकरच त्याची अमलबजावणी करणार आहे 


पालिके कडून शारीरिक अपंग व्यक्तींना आथिॅक दृष्ट्या र-वावलंबी उदेशाने दूरध्वनी केंद्र चालवण्यासाठी अनुज्ञापन पत्र (लायसन्स) देण्यात येथे हयातून मिळणा-या उत्पन्नामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, औषधोपचार , इत्यादी कौटुंबिक दैनंदिन गरजा पूर्ण होत असतात तसेच अपंग व्यक्तींना मिळालेले अनु ज्ञान पत्र पालिकेच्या इतर अनुज्ञापन प्रमाणे अपंग व्यक्तिंच्या मृत पश्चात त्यांच्या कोंटुंबातील व्यक्तींच्या नावे हस्तांतरित होत नसल्यामुळे  , त्यांच्या कुटुंबियांना दूरध्वनी केंद्राच्या माध्यमातून मिळणा-या  उत्पन्नास मुकावे लागत आहे ही सव॔ वर-तुरि-थती लक्षात घेऊन पालिकेने अपंग व्यक्तीच्या नावे असलेल्या दूरध्वनी केंद्राचे अनुज्ञापन पत्र त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कायदेशीर वारसांच्या अथवा पत्नीच्या , पतीच्या नावे हस्तांतरित करावा अशी ठरावाची सूचना नगरसेवक  मनोज जामसूतकर यांनी केली होती त्याला पालिका सभागृहाने एक मताने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता पालिका प्रशासन लवकर अमलबजावणी करणार आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages