मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ३१ मे रोजी काढण्यात येणार्या १0६३ घरांच्या सोडतीसाठी ५१ हजार २८८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १४ हजार ५५६ अर्जदारांनी अर्ज यशस्वीरीत्या दाखल केले आहेत.
म्हाडाच्या घरांसाठी १,0९,३७१ अर्जदारांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. त्यापैकी ७२,0३८ अर्जदारांनी अर्ज दाखल केले असून, ६९ हजार ६१६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील घरांसाठी ५0 हजार ९३९ अर्ज तर कोकण मंडळासाठी ३४९ अर्ज दाखल झाले आहेत. एकूण १४ हजार ५५६ अर्जदारांनी अर्ज यशस्वीरीत्या भरले असून त्यापैकी ८,३३९ अर्जदारांनी ऑनलाईन अनामत रक्कम भरली असून ६,२४४ अर्जदारांनी डीडीने अनामत रक्कम भरणा केली आहे. म्हाडाच्या घरांसाठी १४ मेपर्यंत नोंदणीप्रक्रिया सुरू राहणार असून १८ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची वेळ देण्यात आली आहे.