मुंबई : शनिवारी महापालिका मुख्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीत अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नका, असे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख अश्या सर्वच वरिष्ठ अधिकार्यांना दिले.पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांचा आढावा घेताना, 'या वर्षी नालेसफाईनंतर काठावरील गाळही दिसता कामा नये, त्याची त्वरित विल्हेवाट लावली पाहिजे, असे आदेशही आयुक्तांनी दिले.प्रत्येक वरिष्ठ अधिकार्याने त्यांना नेमून दिलेले काम पारदर्शक व सचोटीने केले पाहिजे, असे सांगताना, मुंबईकरांना चांगल्या सेवासुविधा देण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे, असेही त्यांनी सुनावले.
आयुक्तांनी शनिवारी पालिका मुख्यालयात सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख या वरिष्ठ अधिकार्यांची सकाळी १0 पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत 'मॅरेथॉन'बैठक घेतली. मुंबईतील पावसाळापूर्व नालेसफाई, सफाईनंतरही त्यांच्या काठावर तसाच ठेवलेला गाळ, अनधिकृत बांधकामे, पावसाळ्यात अतिधोकादायक ठरणार्या इमारती, पावसाळ्यात कावीळ, डेंग्यू व मलेरियाचा होणारा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजना, वरिष्ठ अधिकार्यांचे त्यांच्या सहकारी कर्मचार्यांशी आवश्यक असलेले सौहार्दपूर्ण संबंध या महत्त्वाच्या मुद्दय़ांविषयी या बैठकीत सखोल ऊहापोह झाला.
सर्वसामान्य मुंबईकरांना मिळणार्या नागरी सेवा-सुविधांचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी आणि चांगले जनहित ठेवण्याच्या केंद्रस्थानी सहाय्यक आयुक्त असून विभागीय सहाय्यक आयुक्तांनी आपापली सर्व कामे सचोटीने व पारदर्शकतेने केली पाहिजेत, ही कामे करताना त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तसेच सर्व सहाय्यक आयुक्तांचा अनधिकृत बांधकामे करणार्यांवर धाक असलाच पाहिजे, असे काम त्यांनी करावे, बेकायदा बांधकामांना अजिबात थारा देऊ नये, पालिका प्रशासानाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडल्यास आणि त्यात पारदर्शकता असल्यास लोकांचा पालिकेविषयी असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलेल, सर्वसामान्य माणूस पालिकेबद्दल सकारात्मक आहे, असेही निदर्शनास येईल, असा विश्वासही आयुक्तांनी या वेळी व्यक्त केला. पावसाळ्यात कावीळ, डेंग्यू आणि मलेरिया यांच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी सर्व विभागांचे उपायुक्त, खातेप्रमुख यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मेहता यांनी करून, सहाय्यक आयुक्तांनी त्यांना नेमून दिलेल्या भागात सूक्ष्म नजर ठेवावी आणि लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असेही आयुक्तांनी या बैठकीत सांगितले.
पाणी तुंबता कामा नये!
यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबणारे ४0 'स्पॉट्स' असून तत्पूर्वी नालेसफाई चांगली झाली पाहिजे. सफाईनंतर काठावर टाकण्यात येणार्या गाळाची त्वरित विल्हेवाट करण्यात यावी, ४0 ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता असल्यामुळे तेथे तुंबणार्या पाण्याचा त्वरित उपसा करून मुंबईकरांना कमी त्रास होईल, याची दक्षता घेण्याचेही आदेश मेहता यांनी दिले.
अतिधोकादायक इमारतीत राहणार्यांचे प्रबोधन करा !
अतिधोकादायक इमारती पाडण्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिली असल्यास, तेथे राहणार्यांच्या जीविताला धोका आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे आणि अतिधोकादायक बांधकामे पाडण्याची अनुमती द्यावी, अशी विनंतीही न्यायालयाला संबंधित अधिकार्यांनी करावी. तसेच अतिधोकादायक इमारतींमध्ये लोकांनी राहू नये, त्यांच्या प्रबोधनासाठी याबद्दल माहिती द्यावी, असेही मेहता म्हणाले.