म्हाडा सोडत २0१५ : १0६३ घरांसाठी १ लाखांहून अधिक अर्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडा सोडत २0१५ : १0६३ घरांसाठी १ लाखांहून अधिक अर्ज

Share This
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या १0६३ घरांसाठी सायंकाळी ६.३0पर्यंत १ लाख १३ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून डीडीच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी बुधवारी अंतिम तारीख देण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ५0 हजार ५00 अर्जदारांनी अर्ज दाखल केले व शेवटच्या दिवशी १ लाख १३ हजार ८३५ अर्जदारांनी सायंकाळी ६.३0 वाजेपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल झाले. 
सोडतीच्या दुरुस्त अर्जदारांची यादी २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होणार असून अंतिम यादी २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्वीकृत करण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी सकाळी १0 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडतीचा सोहळा पार पडणार आहे. गव्हाणपाडा मध्यम उत्पन्न गट १८५ घरांसाठी ४६ लाख ६१ हजार ४00 रुपये, तर गव्हाणपाडा येथील अल्प उत्पन्न गटातील १८२ घरांसाठी २६ लाख १ हजार १९२ रुपये, मानखुर्द येथील ६६ घरांची किंमत २३ लाख ४८ हजार ९३0 ठरविण्यात आली आहे. प्रतीक्षानगर मध्यम उत्पन्न गट ५६ घरांची किंमत ३७ लाख ५३ हजार ५५0 रुपये, उन्नतनगर गोरेगाव अल्प उत्पन्न गट १८२ घरांची किंमत २८ लाख ६0 हजार ९२४ रुपये व अत्यल्प उत्पन्न गट ९४ घरांची किंमत प्रत्येकी १८ लाख १४ हजार १00 रुपये आली आहे. मालाड अत्यल्प उत्पन्न गट २३२ घरांची किंमत १८ लाख २२ हजार 0५७ रुपये अशी किंमत ठरविण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages