अवैध गौण खनिज उत्खनन - दंडाच्या रकमेत पाच पट वाढ; वाहनेही जप्त होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अवैध गौण खनिज उत्खनन - दंडाच्या रकमेत पाच पट वाढ; वाहनेही जप्त होणार

Share This
मुंबई : गौण खनिजाच्या अवैध उत्खननास आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गौण खनिजाचे उत्खनन करणार्‍यांना आता पाच पट दंड आकारण्यात येणार असून वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच वाहनेही जप्त करण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे नवीन तंत्रनिकेतन सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.या तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी या ५ विद्या शाखांमध्ये प्रत्येकी ६0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार एकूण ३ वर्षांचे मिळून १0२0 विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता ७0 टक्के, तर उर्वरित ३0 टक्के जागा सर्वसाधारण व राखीव प्रवर्गांतून भरण्यात येणार आहेत. तसेच एकूण प्रवेश क्षमतेच्या ३0 टक्के जागा विद्यार्थिनींकरिता राखीव असतील. तसेच राज्यातील करमणूक शुल्काची वसुली जास्तीत जास्त व्हावी यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार करमणूक शुल्क भरण्यात कुचराई करणार्‍या व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages