मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नगरसेवकांना वापरता न आलेला एक कोटी ६0 लाख रुपयांचा प्रभाग समिती निधी आणि नगरसेवक निधी विकासकामांसाठी वापरता यावा म्हणून पालिका आयुक्तांनी निधी खर्च वापरण्यासाठी २२ दिवसांचा अवधी दिला आहे. 'ई टेंडरिंग' प्रक्रियेमुळे आधीच विकासकामे रखडल्याची गार्हाणी मांडणार्या नगरसेवकांना आता अल्पावधीत निधी खर्च करण्याची कसरत करावी लागणार आहे.
२0१४-१५ या आर्थिक वर्षात झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसल्यामुळे नगरसेवकांचे अडीच महिने कामच होऊ शकले नाही. ३१ मार्च २0१५ पूर्वी हा निधी खर्च करणे आवश्यक असल्यामुळे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्यांनी निधी खर्च करण्यासाठी अवधी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून २२ मे २0१५ पर्यंत प्रभाग समिती निधी आणि नगरसेवक निधी खर्च करण्याची मुभा नगरसेवकांना दिली आहे. हा निधी नगरसेवकांनी २२ दिवसांत वापरला नाही तर तो वाया जाणार आहे.
नगरसेवकांना एक कोटी ६0 लाख रुपयांचा निधी वापरण्यासाठी फक्त या वर्षीच विशेष व खास बाब म्हणून परवानगी दिली आहे. भविष्यात या निर्णयाचा पूर्वदाखला म्हणून वापर करून निधी वापरासाठी मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेवकांना करता येणार नाही, असेही आयुक्तांनी परिपत्रकात म्हटले आहे.