भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम.

Share This
राज्यात भाजपा-शिवसेना सरकार सत्तेत आल्यापासून सहाशेहून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असताना केंद्रीय कृषीमंत्री संसदेत महाराष्ट्रात फक्त तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची व तशी माहिती महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे पाठविल्याचे सांगतात. राज्याचे कृषीमंत्री ज्या शेतकऱ्यांनी चिठ्ठ्या  लिहून ठेवल्या त्यांच्याच आत्महत्या ग्राह्य धरल्या असल्याचे सांगतात. अशा प्रकारे भाजपा सरकारमधील नेतेमंडळी नैसर्गीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचे काम करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ,सुनिल तटकरे यांनी सरकारवर  केली. 


पुढे ते म्हणाले  राज्य सरकारने खरिपाच्या बैठका घेण्याचे नाटक सुरू केले आहे. रब्बी पिकांच्या नुकसानीची भरपाई अजूनपर्यंत मिळालेली नाही. काजू आणि आंबा उत्पादकांना मदत मिळण्यासाठी मी विधानपरिषदेत आवाज उठवला होता. महसूल मंत्री खडसे यांनी आश्वासन देऊनही आबां आणि काजू उत्पादकांना मदत दिलेली नाही. आता तर आंब्याचा हंगामही संपला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहात आक्रमक राहिलेली आहे. यापुढे संघटन मजबुती करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याचे धोरण ठरविले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. संबंध राज्यभरात पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार तसेच राज्यातील नेतेही या दौऱ्यात सहभागी होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राज्यात सध्या शेतकरी अनेक स्तरावर अडचणींचा सामना करत आहे. कोकण आणि विदर्भाचा धान उत्पादकाला आधारभूत किमंत मिळत नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना धानाला बोनस देऊन त्यांनी आधारभूत किमंत कायम ठेवली होती. परंतु या सरकारने अद्यापही कोकण आणि विदर्भात एकही तांदळाचा दाना खरेदी केलेला नाही. त्यातच अवकाळी पावसाळामुळे अनेक ठिकाणी धान उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांच्यासाठी सरकारशी संघर्ष करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

१५ मे पर्यंत पक्षाची नवी कार्यकारणी जाहिर करणार – सुनिल तटकरे
लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेला फक्त दोन महिने असताना माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता मात्र आम्ही विरोधी पक्षात आहोत. माझ्यासमोर पक्षसंघटना मजबूत करण्याच आव्हान आहे. कार्यकर्त्यांच मनोबल उंचावण्याची आज गरज आहे. तसेत शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या मागण्यांसाठी उभ राहण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे. या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषदेत आम्हीच प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती. पुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत राहू, असे तटकरे यांनी सांगितले.

१५ मे पर्यंत पक्षाची नवी कार्यकारणी जाहिर करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. यावेळी कार्यकारणीची संख्या मर्यादित असून त्यांच्यावर निश्चित स्वरुपाची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांना निर्णयप्रक्रियेतही समाविष्ट करण्यात येईल.
बुथ कमिटि, तालुका, जिल्हा आणि सहा महसूल विभाग स्तरावर सर्व समाजातल्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी देणार आहोत. तसेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांना काम करण्याची मुभा असेल. राष्ट्रीय समितीच्या ८८ लोकांच्या समितीमध्येही सर्व समाजातील कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व दिले जाईल. यापुढे प्रत्येक जिल्ह्याचे संपर्क नेते आणि जिल्हा निरिक्षक नेमले जाणार आहेत.

३१ जुलैपर्यंत तटकरे हे राज्यातील ३५ जिल्हे आणि सर्व महानगरपालिका क्षेत्रांचा दौरा करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याकाळात सर्व सेलची पुर्नरचना करण्यात येणार आहे. केडर बेस पार्टी तयार करण्याकडे पक्षाची वाटचाल असेल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, हेमराज शाह, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, क्लाईड कास्ट्रो, संजय तटकरे,महेश तपासे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages