२१ ते २३ मे एव्हरीथिंग अबाऊट वॉटर एक्स्प्रो २0१५ चे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२१ ते २३ मे एव्हरीथिंग अबाऊट वॉटर एक्स्प्रो २0१५ चे आयोजन

Share This
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ईए वॉटर प्रा. लि. या कंपनीशी करार केला असून या दोघांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ मेदरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव पूर्व येथे १२ व्या एव्हरीथिंग अबाऊट वॉटर एक्स्प्रो २0१५ चे आयोजन करण्यात आले आहे. 
या एक्स्प्रोमध्ये पाण्याचे संधारण आणि पुनश्‍चक्रण या संदर्भातील वेगवेगळय़ा उपाययोजनांचा धांडोळा घेतला आहे. हा उपक्रम पाण्याशी निगडित दक्षिण आशियातील सर्वात मोठा आणि जगातील आघाडीच्या वार्षिक उपक्रमांपैकी एक मानला जातो. या एक्स्प्रोमध्ये २१ देशांतील ३00 हून अधिक प्रदर्शक आपापल्या देशातील जल व्यवस्थापनावरील अत्याधुनिक तंत्रज्ञाने आणि उपाययोजनांचे प्रदर्शन करतात. या वेळी देशात पहिल्यांदाच १00 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शक आपली उत्पादने प्रदर्शनार्थ मांडणार आहेत. हा एक्स्प्रो तीन दिवस चालणार असून त्यात पाण्याचा पुनर्वापर आणि पुनश्‍चक्रण, समुद्रजलाचे नि:क्षारीकरण पिण्याच्या पाण्याचा सामूहिक पुरवठा, ऑनलाईन रिअल टाइम सांडपाणी देखरेख यंत्रणा आणि इतर अनेक अतिप्रगत तंत्रज्ञानांवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. या एक्स्प्रोला सरकारी, औद्योगिक, सल्लामसलत, संशोधन आणि व्यापारी समूहातील २0 हजारांहून अधिक व्यावसायिक हजेरी लावतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages