झोपडपट्टीवासीयांना साडेचारशे चौरस फुटांची घरे मिळाली पाहिजेत! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झोपडपट्टीवासीयांना साडेचारशे चौरस फुटांची घरे मिळाली पाहिजेत!

Share This
मुंबई - एसआरए प्रकल्पात झोपडपट्टीवासीयांना साडेचारशे चौ. फुटांची घरे द्यावी व यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वक्तव्य रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केले. अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसीमधील ज्ञानरेखा बुद्ध विहार समिती आयोजित तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आठवले बोलत होते. 


शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जोडायचे कार्य केले. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे, जर ते नसते तर देशाची परिस्थिती फारच बिकट झाली असती, असे ते म्हणाले. निवडणुकीवेळी कोणाला निवडून द्यायचे व कोणाला पाडायचे ते आम्ही ठरवतो. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आपण भाजपासोबत जाण्याची रिस्क घेतली, मात्र आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याबाबत नितांत आदर असल्याचे ते म्हणाले. सेनेचे १८ खासदार असतानाही त्यांना एकच भारी उद्योगाचे मंत्रीपद मिळाले, मात्र आपला एकही खासदार नाही, त्यामुळे केंद्रात व राज्यात आरपीआयला सत्तेत कधी वाटा मिळणार आहे, हे काही आपण सांगू शकत नाही, असे ते म्हणून अप्रत्यक्षपणे भाजपावर मिश्किलपणे टीका केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages