भारतीय बौद्ध महासभेचे 16-17 मेला मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रिय अधिवेशन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारतीय बौद्ध महासभेचे 16-17 मेला मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रिय अधिवेशन

Share This
मुंबई । प्रतिनिधी - भारतीय बौद्ध महासभेचे 16 व 17 मे रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. मुंबईच्या सोमय्या मेडीकल कॉलेज ग्राउंड सायन चुनाभट्टी येथे हे 8 वे पंचवार्षिक राष्ट्रिय अधिवेशन संपन्न होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महासचीव जगदीश गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या अधिवेशनामधे धम्म व् धम्माशी संबंधीत अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहे. या अधिवेशनामधे देशातील मुंबई, महाराष्ट्र सह देशभरातील राज्य शाखा सामील होउन अनेक महत्त्वपूर्ण घडामोडीवर चर्चा केली जाणार आहे. 16 में रोजी मिराताई आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या अधिवेशनात बौद्धांचे धार्मिक संस्कार, विधीमधे करण्यात आलेले बदल व दुरुस्त्या जाहिर करणे, देशातील बौद्ध संस्कृती अस्तित्व व् भवितव्य, धम्म चळवळ आणि महिलांची जबाबदारी सद्य स्थितीचा आढावा, धम्म प्रचार व् प्रसार - भिक्कू संघाची जबाबदारी व् सद्य स्थिती यावर 16 मेंला चर्चासत्र आयोजीत केले आहे. तर 17 में ला बौद्धांचे सरक्षण कवच समता सैनिक दल, धम्म प्रचार व् प्रसार यामध्ये बुद्धिस्ट सोसायटीचा सिंहाचा वाटा या विषयावर चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मान्यवर व्यक्ती सहभागी होणार असल्याची माहिती गवई यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages