मुंबर्इ, दि. ०६ मे, (प्रतिनिधी) : सन २०१४-१५च्या वर्षातील समाजभुषण पुरस्कार आणि समता गौरव पुरस्कारांचे वितरण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आणि समरसतेच्या विचारांवर राज्य सरकार कृतीशीलपणे काम करत असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांच्या सन २०१४-१५ या वर्षातील पुरस्कारांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंती निमित्त समता गौरव पुरस्करांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.
आज वितरीत करण्यात आलेल्या पुरस्कर्त्यांना त्यांनी शोषितांसाठी केलेल्या संघर्षपणे सेवेची दखल घेऊन प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार अलंकार नाही. या पुरस्काराने या सर्वांची जबाबदारी वाढली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनी देशाला बलशाली बनविले आणि त्यांचेच विचार घेऊन हे सरकार मार्गक्रमणा करेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या चार महिन्यांत लंडन येथील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर राज्य सरकारने ताब्यात घेऊन तेथे त्यांच्या नावाने अध्यासन निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत. याशिवाय इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. या दोन्ही महत्वाच्या कामात मागील सरकारने भिजत घोंगडे केले होते. मात्र, केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन राज्य सरकारला या कामात सहकार्य केले असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, यंदाचे वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त समता वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. बाबासाहेबांच्या विचारानुसार राज्य सरकार मार्गक्रमण करत आहे. लंडन येथील डॉ. बाबासाहेबांची राहती वास्तू ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार मांडले. हे सरकार भाजप-शिवसेना युतीचे असले तरी केवळ शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन हे सरकार थांबणार नाही. तर आंबेडकरप्रेमींना कृतीशीलपणे काम करुन दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समता गौरव पुरस्कारांसाठी समाजातील दिन दुबळ्या पिडित अपंग कुष्ठरोगी व्यक्तींना त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी स्वत:च्या स्वार्थापलीकडे मदत आणि सेवा करणा-या व्यक्ती आणि संस्थांना गौरविण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुतार्इ सपकाळ, डिक्कीचे मिलिंद कांबळे, पत्रकार यदु जोशी आणि संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अंध कलाकार प्रभाकर धाकडे यांचा सन्मान करण्यात आला. १ लाख रूपये रोख, सन्मान चिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या शिवाय या पुरस्करासाठी हॅप्पी होम स्को फॉर ब्लाइंड, मुंबर्इ अन्नपूर्ण परिवार पुणे, अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था वानवडी पुणे, बाबूराव रागोजी देशमुख सेवाभावी संस्था कागल कोल्हापूर, संवेदना सेलेब्रर विकसन केंद्र लातूर, गाविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद निलंगा लातूर, दिनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ यवतमाळ, संपूर्ण बांबू केंद्र धारणी अमरावती, बहुभूती शिक्षण संस्था आमगाव गोंदिया आणि मातृसेवा संघ नागपूर या संस्थांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. बाबासाबेर आंबेकडर यांच्या समतेवरील विचारांवर आधारित लघु चित्रफित आणि सामाजिक न्याय विभागांच्या योजनांची माहिती देणारा माहितीपट दाखविण्यात आला.

.jpg)
.jpg)