रिक्षाचालकांचा 17 जूनला बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2015

रिक्षाचालकांचा 17 जूनला बंद


मुंबई। प्रतिनिधी - रिक्शा व्यवसाया विरोधात सुरु असलेल्या अन्याय कारवाया त्वरीत थांबवाव्यात यासाठी 17 जूनला महाराष्ट्रातील रिक्शा चालक मालक संघटना सर्वत्र आंदोलन करून मोर्चे काढतील, यामुळे या दिवशी रिक्शा सेवा बंद ठेवली जाइल असे शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.


मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत राव बोलत होते. यावेळी बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हकीम समितीचा अहवाल एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेताना कोणत्याही संघटनेला परिवहन मंत्र्यानी चर्चेला बोलावल नसल्याचे राव यांनी सांगीतले. हकीम कमिटीचा अहवाल रद्द केल्याने रिक्शा व्यवसाय धोक्यात येवून ओला व् उबर सारख्या खाजगी ट्याक्सी सेवाना बळकट केले जाणार असल्याचा आरोप राव यांनी केला. ओला व् उबर या खाजगी ट्याक्सी सेवा बंद कराव्यात, हकीम समितीचा अहवाल रद्द करण्याची भूमिका सरकारने बदलावी, रिक्शा परमीटबाबत जाचक अटी रद्द कराव्यात या मागण्यांसाठी 15 लाख रिक्शा चालक मालक आंदोलन करणार असल्याचे राव यांनी सांगीतले.

Post Bottom Ad

JPN NEWS