नाले गाळात मात्र - पालिकेचा 37 टक्‍के नालेसफाई चा दावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नाले गाळात मात्र - पालिकेचा 37 टक्‍के नालेसफाई चा दावा

Share This
मुंबई शुक्रवार (प्रतिनिधी) - गेल्या पाच दिवसापासून पालिकेने शहरातील मोठे व लहान नाल्यांची सफाई सुरू केली आहे. या पाच दिवसात पालिकेने चक्क 37 टक्के नालेसफाई केल्याचा छातीठोक दावा केला आहे. त्यामुळे हा प्रशासनाचा दावा पहिल्याच पावसात सार्थक ठरणार का याकडे मुंबईकरांचे लक्ष्य लागले आहे. गेल्या वर्षी पहिल्याच पावसात नाले तुंबून काही ठिकाणी जमलय झाली होती.  या वर्षी ही तिचं  स्थीती निर्माण होणार का अशी भीती मुंबईकर करत आहे
 
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईला सुरूवात करते. मुंबईत 45 मोठे नालेअसून ३८ लहान नाले आहेत. तर पातमुखे, 175 बाह्यपातमुखे आणि एक लाख 75 हजार रस्त्यांच्या शेजारील गटारे  आहेत. या नाल्यांची सफाई करण्यासाठी पालिकेने २०० कोटीं रुपयांचा दोन वर्षाचा मेगा प्लान तयार केला आहे. मात्र, पालिकेने यंदा उशीराने नाले सफाईला सुरूवात केली असली तरी आतापर्यंत लहान व मोठ्या नाल्यातून ३७ टक्के गाळ काढल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांची ३९. ४२ टक्के आणि पुर्व उपनगरातून ३२. ४१ टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के पावसाळ्यात ३० आणि पावसानंतर १० टक्के नाले सफाई करण्याचे सुत्र प्रशासनाने आखले आहेत. तर पावसाळ्यात सर्वात हाणी असलेल्या मिठी नदीची ६ मे पर्यंत ३६ टक्के गाळ काढण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यापूर्वी ३५९६४४ क्युबीक मीटर गाळ काढणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेने ६ मे पर्यंत १२२१६१ मीटर लांबीचे नाले साफ केले आहेत. त्यातून १२७०५८ गाळ काढण्यात आला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, तरीहीमुंबईतील नाल्यात कचऱ्याचे ढिग दिसून येत असल्याने पालिका प्रशासनाने खरंच नालेसफाई केली का, असा सवाल समस्त मुंबईकर व्यक्त करीत आहेत.


नालेसफाई दावा पोकळ- देवेंद्र आंबेरकर
पालिकेने ३७.२० टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. हा दावा केवळ पोकळ आणि कागदी आहे. मी उपनगरात राहतो. त्यामुळे पश्चिम उपनगरातील मोठे नाल्यांवर दृष्टीक्षेप टाकला असता अद्यापही नाले साफ केले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हा दावा बोगस आहे, अशी प्रतिक्रिया पालिका विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर यांनी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages