मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- पालिका शाळेतील विद्यार्थी टापटीप दिसावे याकरिता खासगी कंपन्यामार्फत सुरू करण्यात येणाऱ्या भाजपाच्या लॉंन्ड्री संकल्पना योजनेची शिवसेनेने धुळाई केली. विद्यार्थांचे गणवेश धुण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी कानमंत्र पालिका सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांना दिला आहे. तसेच या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा भाजपा आणि सेना यांच्यात युध्द रंगण्याची शक्यता आहे.
पालिका दरवर्षी पालिका विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वस्तू २७ वस्तू वाटप करते. त्यात गणवेशाचाही समावेश आहे. हे गणवेश धुण्यासाठी पालक सक्षम आहेत. त्यापेक्षा आपण शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. कारण पालिका शाळेत लॉंन्डी उघडायला लॉन्ड्रीवाल्यांना जागा, पाणी तसेच धुतलेले कपडे सुकविण्यासाठी जागा कुठे देणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पालिका शाळेत लॉन्ड्री कुठून सुरू करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपाने या स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून मंजूरीसाठी आणल्यास त्यास सेनेचा विरोध राहिल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केले.