सीटी स्कॅन मशीन दीड वर्षापासून बंद - रुग्णांचे हाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीटी स्कॅन मशीन दीड वर्षापासून बंद - रुग्णांचे हाल

Share This
मुंबई (प्रतिनिधी)- पालिकेच्या भगवती रुग्णालयातील दीड वर्षापासून बंद असलेले सीटी स्कॅन मशीन बांद्रा येथील भाभा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे हे मशीन त्याठिकाणी कितीकाळ सेवा देईल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आरोग्य समितीत शताब्दी रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनबाबत मुद्दा मांडण्यात आला. या मुद्द्यावर प्रशासनाने ठोस उत्तर न दिल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली.

पालिकेचे कांदिवली येथे शताब्दी रुग्णालय आहे. या रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत असतात. परंतु, या रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनचा अभाव आहे. कित्येक वर्षापासून रुग्णालयात मशीन नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णालयात मशीन उपलब्ध करुन देण्यासाठी कॉंग्रेसच्या नगरसेविका अजेंता यादव यांनी हरकतीचा मुद्दा मांडला होता. यावेळी भगवती रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती सुरू असल्यामुळे याठिकाणचे सीटी स्कॅन मशीन कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात यावे, सूचना यादव यांनी केली होती. सत्ताधारी वगळता सर्व पक्षांनी मुद्दाला पाठिंबा दिला. मात्र, गेल्या दोन वर्षापासून हे मशीन भगवती रुग्णालयात धुळ घात पडून असल्याचे सांगताना प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी न्याय मिळत नसल्याचे पाहून विरोधकांनी आरोग्य समिती अध्याक्षांनाच घेराव घातला. मनसेनेही कॉंग्रेसला पाठिंबा देताना, रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन लवकरात लवकर लावण्याची मागणी केली.

दरम्यान, भगवती रुग्णालयाचे इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथील सीटी स्कॅन मशीन बांद्रा येथील भाभा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. तर शताब्दी रुग्णालयात येत्या  तीन महिन्यात नवीन मशील लावण्यात येणार आहे. भगवती रुग्णालयातील मशीन हलविण्यासाठी क्रिष्णा डायग्नोस्टीक सेंटरला काम दिले होते. त्यासाठी नोव्हेंबरला नोटीस दिली होती. मात्र, या कंपनीने काम न केल्यामुळे कुपर येथील रुबी कंपनीला काम देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी सुहासिनी नागदा यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages