आक्सा बीचवर 4 महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2015

आक्सा बीचवर 4 महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले

मुंबई (प्रतिनिधी) – मालाडच्या आक्साबिचवर पोहण्यासाठी गेलेल्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला असून दोघांना कांदिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. एक जण पाण्याबाहेर थांबल्याने तो सुखरूप आहे.


मलाड येथील आक्साबीच पाच महाविद्यालयीन विद्यार्थी पोहण्यासाठी आले होते. त्यापैकी राहल विश्वकर्माला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बाहेर थांबला होता. तर दिपशीका गुप्ता(२०)हेमंत शर्मा (२२)मोनिका फर्नांडिस (२१),शेखर गायकवाड (२१) पोहण्यासाठी पाण्यात उतरले. या चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यावेळी बीचवरील असलेल्या लाईफ गार्ड रजनीकांत माशेलकर यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चौघांना वाचवण्याचे प्रयत्न केले. तोपर्यंत नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दिपशीका आणि हेमंत या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर मोनिकाला वाचविण्यात माशेलकर टीम यश आले असून त्याला उपचारार्थकांदिवलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. बुडालेल्यांपैकी शेखर याचा अद्याप थांगपत्ता न लागल्यामुळे अग्निशामन दलाचे अधिकारी व स्थानिक लाईफ गार्डच्या मदतीने शेखरचा शोध घेत असल्याची माहिती पालिकेच्या आपात्कालीन विभागाने दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS