राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त 5 गाईडसचा सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त 5 गाईडसचा सत्कार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - महापालिका शिक्षण विभागातर्फे चालविण्यात येणाऱया स्काऊट-गाईड चळवळीला ९० वर्षांचा इतिहास आहे. हा स्वतंत्र विभाग असून येथे बनी टमटोला, कब-बुलबुल, स्काऊट गाईड या प्रकल्पांद्वारे पूर्व प्राथमिक शिशु वर्गापासून १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिस्त, स्वावलंबन, सेवाभाव जागृत करण्यासाठी ही चळवळ कार्यरत आहे. त्यासोबतच पुरस्कार हे कर्तृत्व बळकट करण्याचे स्रोत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी केले. 

या चळवळीमार्फत सन – २०१४ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय पातळीवर झालेल्या ‘राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिरा’त उत्तीर्ण झालेल्या काळबादेवी महापालिका शाळेतील दिपाली सर्जेराव साळवे, तेजस्विनी यशवंत खडतर, पूजा प्रदीप मंत्री, कोमल भगवान वंडुस्कर आणि अक्षता राहुल तांबे या ५ गाईडस् (विद्यार्थीनी) चा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांच्या दालनात (दिनांक ०६ मे, २०१५)  गौरव करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages