मुंबई (प्रतिनिधी): पावसाळय़ात शहर विभागात पावसाचे पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना आणि विविध प्रकल्पांची आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी पाहणी केली. या वर्षी कार्यान्वित होणार्या लव्हग्रोव्ह व क्लिव्हलँड या दोन्ही पर्जन्य उदंचन केंद्रामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
नेहरू सायन्स सेंटर, महालक्ष्मी जंक्शन आणि रेसकोर्स नाला येथील गाळ काढणे क्लिव्हलँड बंदर येथे सुरू असलेल्या व पूर्णत्वास आलेल्या पर्जन्य उदंचन केंद्राची पाहणी केली. क्लिव्हलँड बंदर पर्जन्य उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यास, दादर मार्केट, दादर रेल्वे स्टेशन, भवानी शंकर रोड, म्हात्रे पेन वर्क्स, दादर सिवरेज ऑपरेशन्स सेंटर, फितवाला लेन, सनमिल लेन, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, ड्रेनेज चॅनेल रोड, एन.एम. जोशी मार्ग, शंकरराव नरम मार्ग, शिवराम अमृतवार मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, सेनापती बापट मार्ग (दक्षिण) या विभागांतील पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरित होण्यास मदत होणार आहे. एफ/ दक्षिण विभागासमोरील मडकेबुवा चौक येथे पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून तेथे खडक लागल्याने काही अडचण येत आहे, तरीही हे काम येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण करून रस्त्याचे समतलीकरण करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले.
शिवडी, रेती बंदर येथील ब्रिटानिया पर्जन्य उदंचन केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत या उदंचन केंद्राचे काम पूर्ण होईल. वरळी लव्हग्रोव्ह उदंचन केंद्र येथील पर्जन्य उदंचन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून तेथील कामाची पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी सदरहू पर्जन्य उदंचन केंद्र मेअखेर सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे संबंधित अधिकार्यांना आदेश दिले.

.jpg)