गोवंडीत लाचखोर मनपा अधिकार्‍याला रंगेहाथ अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोवंडीत लाचखोर मनपा अधिकार्‍याला रंगेहाथ अटक

Share This
मुंबई : गोवंडी परिसरातील घनकचरा उचलणार्‍या कंपनीच्या मालकाला उर्वरित बिल मंजूर करून देण्यासाठी ६ हजारांची लाच मागणार्‍या मनपा अधिकार्‍याला एसीबीने रंगेहाथ अटक केली.


याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी यांच्या कंपनीस गोवंडी परिसरातील घनकचरा उचलण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यांच्या या कामाची एकूण ६ बिले अनुकूल विभाग कार्यालयात प्रलंबित होती. ही बिले अनुकूल शेर्‍यासह मंजुरीकरिता पुढे पाठवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन बृन्हमुंबई महानगरपालिका एम/पूर्व विभागाचे पर्यवेक्षक नारायण केशव पवार (५0) यांनी बिले मंजूर करून देण्यासाठी ६ हजारांच्या लाचेची मागणी केली. फिर्यादींना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी एसीबीकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार दाखल केली. बुधवारी गोवंडी एम/पूर्व विभागाच्या मनपा कार्यालयात सापळा लावून नारायण पवार यांना ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages