पालिकेच्या इस्टेट विभागाच्या 77 इमारती अतिधोकादायक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या इस्टेट विभागाच्या 77 इमारती अतिधोकादायक

Share This
मुंबई - मुंबई पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या 714 इमारतींपैकी 77 इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्या तातडीने पाडल्याच पाहिजेत, अशी सूचना स्ट्रक्‍चर ऑडिटरने केली आहे. धोकादायक असलेल्या नऊ इमारतींचे पाणी आणि वीजजोडण्या तोडण्यात आल्या आहेत; मात्र 53 इमारतींतील रहिवासी इमारती रिकाम्या करायला तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींपैकी बहुतांश इमारती शहर भागात आहेत. त्यात जुन्या बीआयटी चाळींचाही समावेश आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींपैकी दोन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. नऊ इमारतींच्या जलजोडण्या कापण्यात आल्या आहेत. 53 इमारतींतील रहिवासी रिकाम्या करायला तयार नाहीत. त्यासाठी पोलिस बळाचा वापरही करण्यात येत आहे. सहा इमारती आतापर्यंत पाडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. सहा इमारती पाडण्याची शिफारस करण्यात आली आहे; मात्र त्याबाबत तांत्रिक सल्लागारांचे पुन्हा मत घेण्यात येणार आहे. ते आल्यानंतर या सहा इमारतींची दुरुस्ती करायची की त्या पाडायच्या, याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेतून देण्यात आली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages