मुंबईत हृदयविकाराने दररोज ८० लोकांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत हृदयविकाराने दररोज ८० लोकांचा मृत्यू

Share This
मुंबई (प्रतिनिधी) - रोजची धावपळ, दगदग, ताणतणाव यामुळे मुंबईत हृदयविकाराने दररोज ८० लोकांचा मृत्यू होत असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. हृदयविकारा बरोबरच मुंबईत क्षयरोगाने १९ आणि कॅन्सरने १७ रुग्णांचा मृत्यू होत आहे.  संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असल्याने हि आकडेवारी मुंबईकरांसाठी धोकादायक आहे. 

मुंबई महापालिकेने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत, गेल्या वर्षभरात विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची आकडेवारी दिली आहे, ती मुंबईकरांना धडकी भरवणारीच आहे. मुंबईत २०१४-१५ मध्ये विविध आजारांनी एकूण ९३ हजार २५४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात ३१ टक्के रुग्ण हृदयविकारानं दगावले आहेत. मार्च २०१४ ते मार्च २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत सुमारे २९ हजार ३९३ जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे, म्हणजेच दररोज ८० जणांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २४ हजार ६०३ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत दररोज सरासरी ६७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. हा आकडा वाढणं ही धोक्याची घंटाच मानली जातेय.

गेल्या १५ वर्षांत विविध आजारांनी दगावलेल्या रुग्णांत हृदयरोगींची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ टीबी (क्षयरोग) आणि कॅन्सर रुग्णांची संख्या आहे. म्हणजेच हृदयविकारापाठोपाठ टीबी आणि कॅन्सरही मुंबईसाठी डेंजर ठरत आहे. २०१४-१५ मध्ये टीबीने दररोज १९, तर कॅन्सरने १८ मुंबईकर दगावत असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.

कोणत्या आजाराने किती मृत्यू?
आजार      २०००-०१   २०१२-१३   २०१३-१४   २०१४-१५ रोजचे बळीं
हृदयविकार ८,१५८        १४,३५५       २४,६०३     २९,३९३     ८०.५
क्षयरोग       ९,३४५         ७,३९१        ५,९५३       ७,०९०     १९.४
कॅन्सर         ३,१३५         ७,३४४       ५,३२८       ६,४६८     १७.७
यकृत          १,८९९             २२०        २,५२७        ३,०६१       ८.४
किडनी        १,४७७        ३,४६०        २,७८८         ३,३८२      ९.३

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages