मुंबई : महापालिकेच्या 'सर्व शिक्षा अभियान'मधील 'त्या' ११ कर्मचार्यांना ८ महिन्यांचा थकीत पगार लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी शनिवारी या कर्मचार्यांना वेतन देण्याच्या 'फाईल'वर स्वाक्षरी करून मंजुरी दिली.
शिक्षण विभागाने या ११ कर्मचार्यांना राबवून घेतले; पण त्यांना गेले आठ महिने वेतनापासून वंचित ठेवले. या कर्मचार्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल शिक्षण समितीमध्ये सदस्यांनी आवाज उठवल्यानंतर शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी त्या कर्मचार्यांना पाच दिवसांत वेतन देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांना दिले. जोगी यांना त्याची दखल घ्यावी लागली आणि नंतर या शिक्षकांचे थकीत वेतन त्वरित देण्याची प्रक्रिया सुरू झाली. शिक्षणाधिकारी जोगी यांनी शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांना सुट्टीच्या दिवशीही कामावर बोलावून वेतन देण्याच्या कामाला जुंपले. शनिवारी वेतनासंबंधीची 'फाईल' दराडे यांच्याकडे मंजुरीसाठी गेल्यावर ती त्यांनी मंजूर करून हातावेगळी केली आहे. यामुळे लवकरच या कर्मचार्यांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, असे सांगण्यात आले.
----------
या कर्मचार्यांना नोकरीपासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी माझी असून त्यांना 'सर्व शिक्षा अभियान'शी संबंधित विविध विभागांमध्ये नोकरी देता येईल का, असेही माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रितू तावडे यांनी दिली. 'या ११ कर्मचार्यांच्या संबंधी मी पुढील आठवड्यात माझ्या दालनात विशेष बैठक बोलावली आहे. त्या वेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त रमेश पवार, शिक्षणाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून या महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी सविस्तर माहिती घेण्यात येईल आणि आवश्यक भासल्यास या विषयावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडेही चर्चा करण्यात येईल. 'त्या' कर्मचार्यांच्या नोकरीसंबंधी मला शिक्षणाधिकार्यांकडून जोपर्यंत सविस्तर माहिती मिळत नाही आणि माझेही त्याबद्दल समाधान होत नाही तोवर शिक्षणाधिकार्यांनी सेवा खंडीत करण्याचे काढलेले आदेश स्वीकारू नयेत, अशा सूचना मी या सर्व ११ कर्मचार्यांना दिल्या आहेत.
रितू तावडे - अध्यक्ष शिक्षण समिती