४-जी : रिलायन्सला १८ कोटींचा दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2015

४-जी : रिलायन्सला १८ कोटींचा दंड

मुंबई : 'फोर-जी' तंत्रज्ञानाच्या केबल्स टाकण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असूनही 'रिलायन्स' ने ती न घेता, अंधेरी व मरोळमध्ये रस्त्यात खोदकाम केल्यामुळे पालिकेने 'रिलायन्स'कडून १८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

अंधेरी व मरोळ भागात मकवाना मार्ग, दी हिंदू फ्रेंड्स सोसायटी मार्ग व मरोळ मिलिटरी रोड येथे खड्डे खोदल्याप्रकरणी पालिकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मरोळ मिलिटरी रोडचा एक किलोमीटरचा पट्टा पालिकेच्या मध्यवर्ती यंत्रणेकडून काँक्रीटचा करण्यात येत आहे. हे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे पण रिलायन्सने 'फोर-जी' केबल्स टाकण्यासाठी हा रस्ता खोदला. यामुळे काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. त्याची दखल महापालिकेच्या स्थानिक सहाय्यक आयुक्तांनी घेऊन, विभागातील रस्ते खात्याला या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले. रस्ते विभागाने पाहणी करून रिलायन्सला विनापरवाना खोदकाम केल्याबद्दल १८ कोटी रुपयांचा दंड आकारला.

'एअरटेल'ला आज बजावणार नोटीस
घाटकोपरला 'एअरटेल' कंपनीची भूमिगत केबल असून ती तुटल्यानंतर या कंपनीने दुरुस्तीचे काम मंगळवारी, १९ मे रोजी हाती घेतले; पण ते करताना पालिकेची भूमिगत जलवाहिनी तोडल्यामुळे स्थानिक रहिवाशांना सलग चार दिवस पाण्यावाचून राहावे लागले. दैनंदिन व्यवहार पाण्याशिवाय पूर्ण करावे लागले. परिणामी, पालिकेने या कंपनीची चौकशी करून त्यांच्याकडून आठ लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची नोटीस 'एअरटेल'ला गुरुवार, २८ मे रोजी बजावण्यात येणार आहे, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS