महिला पोलीस बीट मार्शल स्कूटीवरून मुंबईत गस्त घालणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2015

महिला पोलीस बीट मार्शल स्कूटीवरून मुंबईत गस्त घालणार

मुंबई : महिला पोलीस बीट मार्शल आता नव्या कोर्‍या स्कूटीवरून मुंबईत गस्त घालताना दिसतील. महिला बीट मार्शलांसाठी मुंबई पोलीस दलाकडून हीरो कंपनीच्या ५0 'मेस्ट्रो' स्कूटी प्रायोगिक तत्त्वावर खरेदी करण्यात आलेल्या असून त्यांचे वाटपदेखील करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलीस विभागाच्या मोटार वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त अतुल पाटील यांनी दिली. 

मुंबई पोलीस विभागाच्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील पुरुष बीट मार्शल मोटारसायकलवर गस्त घालत होते. दरम्यान, महिलांवर होणारे गुन्हे, सोनसाखळी चोरांवर आळा बसवण्यासाठी मुंबई पोलीस दलातील १00 महिला पोलीस शिपायांना प्रशिक्षण देऊन त्यांना मुंबईतील पोलीस ठाण्यात महिला बीट मार्शल म्हणून तैनात करण्यात आलेले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन महिला बीट मार्शल असून त्यांना पुरुष बीट मार्शल प्रमाणे विभागात गस्त घालण्यासाठी मोटारसायकली देण्यात आल्या होत्या; परंतु मोटारसायकलच्या वजनामुळे त्यांना गस्त घालताना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई पोलिसांनी महिला बीट मार्शलांच्या सोयीनुसार त्यांना स्कूटी देण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलीस दलाकडून प्रायोगिक तत्त्वार ५0 हीरो कंपनीच्या मेस्ट्रो स्कूटी खरेदी करण्यात आल्या असून प्रथम ५0 पोलीस ठाण्यांना या स्कूटींचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मोटार वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त अतुल पाटील यांनी दिली. स्कूटीमुळे महिला बीट मार्शलांना गल्ली बोळातून जाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही, तसेच स्कूटी वजनाने हलकी असल्यामुळे व्यवस्थित हाताळता येईल. यामुळे अपघाताचे प्रमाणदेखील कमी होईल, या उद्देशाने महिला बीट मार्शलांना गस्तीसाठी स्कूटी देण्यात आलेली आहेत. लवकरच मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांतील महिला बीट मार्शलांना स्कूटी देण्यात येतील, असेही सहपोलीस आयुक्त देवेन भारती म्हणाले. 

Post Bottom Ad

JPN NEWS