निवडणुकीत कमी मते मिळण्यास स्थानिक नेतृत्व जबाबदार - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2015

निवडणुकीत कमी मते मिळण्यास स्थानिक नेतृत्व जबाबदार - आठवले

मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआयच्या उमेदवारांना कमी मते मिळण्यास स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी वाशी येथे बोलताना केला.

रिपाइं (ए) कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी नवनियुक्त महापौर सुधाकर सोनावणे यांचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकार्‍यांना चिकाटीने काम करण्याची सवय नसल्याने त्यांना फैलावर घेतले. आरपीआयच्या प्रत्येक कार्यक्रमांना गर्दी जमत असते. मात्र, निवडणुकीच्या वेळी दलितांची मते नेमकी जातात कुठे? असा सवाल आठवले यांनी या वेळी केला. महापालिका निवडणुकीत आरपीआयच्या उमेदवारांना मिळालेल्या अत्यल्प मतांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या सभागृहात आजतागायत एकही नगरसेवक निवडून गेलेला नाही. मात्र, या प्रयत्नात प्रत्येक निवडणुकीत आरपीआयतर्फे उमेदवार उभे केले जातात. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीतदेखील आरपीआयने उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, या उमेदवारांनी १0 ते २0 मते मिळवल्याची खंतही आठवले त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. विजय मोरे, महेश खरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ,चंद्रकांत जगताप, यशपाल ओहोळ, नरेंद्र जाधव आदींसह मोठय़ा प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS