पावसाळ्यासाठी बेस्ट सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2015

पावसाळ्यासाठी बेस्ट सज्ज

मुंबई : पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी बेस्ट उपक्रमही सज्ज झाले असून, पाऊस सुरू झाल्यावर वीजग्राहकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणे, शॉक लागणे अशा घटना वारंवार होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. मदतीसाठी २२८४३९३९ हा क्रमांक जाहीर केला असून, नियंत्रण कक्ष २४ तास खुला राहणार आहे.
यात अतिरिक्त कर्मचार्‍यांचीही नियुक्ती केली जाणार आहे. ग्राहकांसाठी बेस्टने सुट्टीच्या दिवशीही आणि अहोरात्र कार्यरत असणारे कॉल सेंटर सुरू केले आहे. या केंद्रात फ्युज नियंत्रण, बिघाड दुरुस्ती आदी यंत्रणा जोडण्यात आल्या आहेत. मात्र येथे तक्रार करताना ग्राहाकांना वीज ग्राहक क्रमांक व मीटर क्रमांक नोंदवावा लागेल.

Post Bottom Ad

JPN NEWS