कंत्राटदाराने केबल तोड्ल्याने पालिका मुख्यालायातील इंटरनेट व फोन सेवा आठवडाभर बंद / कर्मचारी, पत्रकार त्रस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2015

कंत्राटदाराने केबल तोड्ल्याने पालिका मुख्यालायातील इंटरनेट व फोन सेवा आठवडाभर बंद / कर्मचारी, पत्रकार त्रस्त

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेसमोरील रस्ता खोदताना कंत्राटदाराने रस्त्याखालील केबल तोड्ल्याने पालिका मुख्यालयातील इंटरनेट व् काही फोन क्रमांक गेले आठवडाभर बंद पडले आहेत. इंटरनेट व् फोन सेवा बंद पडल्याने पालिका मुख्यालयातील इंटरनेट द्वारे होणारी बहुतेक कामे ठप्प पडली आहेत. याचा फटका मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करणारया पत्रकारांनाही बसला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयाच्या समोरील रस्ताच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. रस्त्या खोदताना काळजी न न घेता रस्ता खोदल्याने रस्त्या खालील केबल तोड्ल्या गेल्या आहेत. इंटरनेट व् फोनच्या केबल तुटल्याने पालिका मुख्यालय आणि परिसरातील इंटरनेट व् फोन सेवा गेले आठवडाभर बंद पडली आहे. पालिकेतील इंटरनेट व् फोन सेवा बंद असल्याचा फटका पालिका मुख्यालयातील आयुक्तांपासून बहुतेक सर्वच कार्यालयांना बसला आहे. पालिकेच्या मुख्यालायातच पालिकेचे वृत्तसंकलन करणारया पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष आहे. पत्रकार कक्षामधील इंटरनेट सेवा सुद्धा गेले आठवडाभर बंद असल्याने पत्रकारांना काम करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कंत्राटदाराच्या चुकीमुळे आणि निष्काळजी पणामुळे इंटरनेट सेवा व फोन सेवा बंद पडली असली तरी अद्याप पालिकेने निष्काळजीपणे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. इंटरनेट सेवा व फोन सेवा बंद असल्याने कामाचा खोळंबा होत असल्याने, कामेच होत नसल्याने पालिका कर्मचारी आणि पत्रकारांमधे संताप व्यक्त केला जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS