लाचखोर पालिका अधिकार्‍यास अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2015

लाचखोर पालिका अधिकार्‍यास अटक

मुंबई : भायखळा येथील पालिकेच्या वॉर्ड कार्यालयातील आरोग्य व स्वच्छता विभागातील अधिकार्‍यास तक्रारकर्त्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. नंदकुमार बाबूराव जाधव (५0) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. या अधिकार्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भायखळ्यातील वॉर्ड कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक असणारे जाधव यांच्याकडे माझगाव येथील एका रहिवाशाने तक्रार केली होती. सोसायटीच्या सदस्यांनी इमारतीच्या आवारात बकरी आणि अन्य प्राणी पाळले होते. यामुळे रहिवाशांना त्रास होत असून को-ऑप. हाऊसिंग कायद्याचे ही उल्लंघन होत असल्याचा दावा करत तक्रारकर्त्याने याबाबत भायखळा वॉर्ड कार्यालयात तक्रार केली होती. पालिका याबाबत मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचे तक्रारकर्त्यास दिसून आले होते. जाधव यांनी २0 हजार रुपयांची लाच दिल्यास प्राणी पाळणार्‍या रहिवाशांवर कारवाई होईल, असे म्हटले होते. तक्रारकर्त्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार वॉर्ड कार्यालयात लाच घेतानाच जाधव यांना गुरुवारी अटक करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS