एसटीचा सोमवारी परिवहन दिन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2015

एसटीचा सोमवारी परिवहन दिन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ १ जून रोजी 'परिवहन दिन' साजरा करणार आहे. यानिमित्ताने महामंडळाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या दिनी अधिकारी व कर्मचारी यांचे गट प्रत्येक स्थानकावर प्रवाशांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतील.

अहमदनगर-पुणे मार्गावर महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली होती. या घटनेची आठवण म्हणून १ जून रोजी महामंडळाचा वर्धापदन दिन साजरा होत आहे. मात्र यंदापासून १ जूनचा वर्धापन दिन हा 'परिवहन दिन' म्हणून साजरा करण्यात येईल. या निमित्ताने महामंडळाने सर्व आगर प्रमुखांना सूचना जाहीर केल्या आहेत. परिवहन दिनानिमित्त सर्व बसेस आतून आणि बाहेरून स्वच्छ ठेवण्यात येतील, बस स्थानकावर ध्वनिक्षेपकाद्वारे महामंडळाच्या विविध योजना आणि सुविधांची माहिती देण्यात येईल. या दिवसाचे औचित्य साधून सर्व २५0 आगारांतील सवरेत्तम केपीटीएल आणणारे चालक, सवरेत्तम उत्पन्न आणणारे वाहक आणि विहित निकषानुसार सर्वोच्च कामगिरी बजावलेले यांत्रिक कर्मचारी यांचा आगार पातळीवर सत्कार करण्यात येईल. तसेच सर्व अधिकारी/कर्मचारी महामंडळाप्रती निष्ठा आणि उत्कर्षाबाबत प्रयत्नशील राहण्यासाठी शपथ घेणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS