मुंबई (प्रतिनिधी) - काळबादेवी येथील आगीत शहीद झालेले अग्निशमनदलाचे अधिकारी सुधीर अमीन यांच्या कुटुंबियासचुकीचा धनादेश देवून पालिकाप्रशासनाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माणकामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक आणि सरचिटणीस गिरीश धानुरकर यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.तर स्थायी समितीतही सभागृहनेत्यातृष्णा विश्वासराव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत चूकीचा धनादेश काढणाऱ्यालेखापालवर कारवाई करण्याची मागणी केली.
काळबादेवी येथील गोकुळनिवासइमारतीला लागलेल्या आगीशी मुकाबला करताना अमीन शहीद झालेहोते. त्यांना तत्पूर्वी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यभारदेण्यात आला होता. पालिकेच्या नियमाप्रमाणे कर्तव्य बजाविणाऱ्या अधिकारी व जवानांना त्यांच्या दर्जाप्रमाणे मदतीचा धनादेश दिला जातो.मात्र अमीन यांनापदोन्न्ती दिल्यानंतरही त्यांच्या कुटुंबियासउपप्रमुख अग्निशमन अधिकारी यापदाऐवजी विभागीय अधिकारीया पदानुसार धनादेश देण्यात आला.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी तो धनादेश स्वीकारला नाही. या धनादेशप्रकरणी तांत्रिक चूकझाल्याची कबुली प्रशासनाकडूनदेण्यात आली. त्यामुळेअशाप्रकारे गंभीर चूककरण्याचाअधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी मनसे संघटनेने केली आहे.

