मुंबई (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.याच शिवसेनेचे पक्ष प्रमुख अग्निशमन दलाच्या जावानांना शहिद दर्जा देण्याचा ठराव केला असला तरी शिवसेनेच्या नगरसेवकांना त्याचा विसर पडला आहे. अग्निशमन दलाचे उप प्रमुख अधिकारी सुधीर अमिन यांना 14 मे 2015 रोजी वीर मरण आले. मात्र, कर्तव्यनिष्ठअधिकाऱ्याला स्थायी समिती,सुधार समिती आणि महासभेत साधी श्रध्दांजली वाहिली नाही, ही मोठी दुदैवाची गोष्ट असल्याचे पालिका विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले.
अमिन यांनी 26/11च्या अतिरेकी हल्ल्यात उल्लेखनिय कामगिरी केली होती.त्यामुळे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. परंतु,त्यांचा काळबादेवी गोकूळ आग दुर्घटनेत मृत्यू झाला.त्यांच्या कुंटूंबियांची चौकशी करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी भेटघेतली. यावेळी शहिद दर्जा देण्याचा ठराव मंजूर करावा व पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची सूचना केली.या सुचनेचा मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि नगरसेवक विसरपडला असून पक्ष प्रमुखांच्याच सूचनेला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

