भारतातील जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रत्तेक गाव आणि विहिरीच्या ठिकाणी आता लाल बावटा लावू - सिताराम येचुरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारतातील जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रत्तेक गाव आणि विहिरीच्या ठिकाणी आता लाल बावटा लावू - सिताराम येचुरी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी ) ने आतापर्यंत आर्थिक प्रश्न हाती घेवून काम केले. परंतू भारतामध्ये जातही मोठी समस्या आहे. लोकांचे हृदय परिवर्तन केल्या शिवाय जाती नष्ट होऊ शकत नाहीत. यासाठी यापुढे भाकप सामाजिक प्रश्न हाती घेणार आहे. प्रत्तेक कारखाना, कंपनी इत्यादीच्या गेटवर लाल बावटा दिसत होता. तसेच भारतातील जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रत्तेक गाव आणि विहिरीच्या ठिकाणी आता लाल बावटा लावला जाईल अशी घोषणा भाकपचे सिताराम येचुरी यांनी केली. 

मुंबईच्या आजाद मैदान येथे भाकपच्या वतीने आदिवासींच्या विविध प्रश्नावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चा नंतर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषेदत येचुरी बोलत होते. यावेळी बोलताना केंद्र सरकारने संसदेच्या स्थायी समितीला विश्वासात न घेता ५० कायदे मंजूर केले आहेत हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने लोकसभेत जरी कायदे मंजूर केले असले तरी त्या कायद्यांना राज्यसभेत आम्ही विरोध केला आहे. मागील कॉंग्रेसचे सरकार जे कायदे आणणार होते तेच कायदे भाजपा सरकार आणले आहेत. भाजपा सरकारला बाल कायदा व्यतिरिक्त स्वताचा असा एकही नवा कायदा आणता आलेला नाही. भाजपा सरकारने जो बाल कायदा आणला आहे त्यामध्येही गोंधळ असल्याचे येचुरी यांनी सांगितले. 

देशामध्ये १८ कोटी हेक्टर शेताचे नुकसान झाले असताना प्रधानमंत्री विदेश फिरत आहेत. आधी नरेंद्र मोदी यांना परदेशात जाण्यास विसा मिळत नव्हता. आता केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर मोदी यांनी १८ देशाला भेट दिली आहे. देशामधील निवडणुका संपल्या असताना निवडणुका सुरु असल्याप्रमाणे मोदी विरोधकांवर टिका करत याचा येचुरी यांनी यावेळी निषेध केला. केंद्र सरकारने नियोजन आयोग बरखास्त केला यावर येचुरी यांनी टिका केली. आदिवासी आरक्षणातील जैसे थे परिस्थिती कायम ठेवून कोणत्याही बिगर आदिवासी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या सध्याच्या यादीत करू नये, अनुसूचित जाती जमातीच्या नोकऱ्यातील अनुशेष त्वरित भरावा अशी मागणी येचुरी यांनी यावेळी केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages