लेकीच्या शोधासाठी माता पित्याची वन वन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लेकीच्या शोधासाठी माता पित्याची वन वन

Share This
मुंबई / रशिद इनामदार 
पोटच्या मुलीचे अपहरण झाले तेंव्हापासून तिच्या शोधासाठी मात्या पित्याची दिवसरात वन वन सुरु आहे .लेकीच्या काळजीने ते हवालदिल झाले आहेत. ४ महिने आले तरी अजून तिचा थांगपत्ता लागत नाही त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.तीची  पुन्हा भेट होईल  ही  आशा ही धुसर होऊ लागली आहे . तिचा शोध घेण्यासाठी ज्या कायद्याच्या रक्षकांकडे ते आशेने पहात होते . तेच त्या अपहरण कर्त्याला सहकार्य करत आहेत असा आरोप त्या दुर्दैवी मात्या पित्यांनी केला आहे . चिरागनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकासह इतर काही अधिकारी अपहरण कर्त्याला मदत करत असल्याचा त्यांचा संशय आहे.
                   
चिता कॉम्प , ट्रांबे येथे राहणाऱ्या तबस्सुम शेख चा निकाह तिच्या मात्या पित्यांनी चिरागनगर घाटकोपर येथे राहणाऱ्या सलमान नावाच्या तरूणाशी नक्की केला होता . त्यानुसार त्यांचा साखरपुडाही झाला . त्यानंतर तबस्सुम च्या मात्या पित्यांना मुलगा व्यसनी असल्याची माहिती मिळाली . मोठ्या थाटामाटात लेकीचे लग्न करण्याचे स्वप्न या वास्तवामुळे भग्न पावलं. मुलीचा संसार सुखाचा होणार नाही. तिचे भवितव्य आपण मुद्दाम अंधकारात लोटणे योग्य नाही. त्यामुळे हे लग्न मोडलेलच बरं या निष्कर्षाप्रत ते येउन पोहोचले. त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांकडे लग्न मोडल्याचे कळवले. त्यावरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला .मुलाच्या कुटुंबीयांनी चिरागनगर पोलिस ठाण्यामध्ये मुलगी आणि तिच्या मातापित्यांना बोलावून घेतले . तेंव्हा मुलीचा हात मुलीच्या आईने धरला होता . तिथे कर्तव्यावर असलेल्या अधिकार्यांनी मुलीचा हात सोडण्यास सांगितले व मुलीच्या मातापित्याची तक्रार लिहून घेण्यास सुरुवात केली . तक्रार लिहून घेत असताना मुलीचे पोलिस ठाण्यातून अपहरण करण्यात आले . ती आजवर सापडली नाही . घाटकोपर पोलिस ठाण्यामध्ये मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार ही त्यांनी दिली आहे . पोलिस मात्र आजवर त्या मुलीचा आणि तिच्या अपहरनकर्त्यचा शोध घेऊ शकले नाहीत.

गुन्हे शाखेचे निरीक्षक याकुब मुल्ला आणि अपहरण कर्त्याचा मित्र असलेला एक खबरी यांची आपसात खास ओळख आहे. त्यामुळे अपहरण कर्त्याचा, अपर्हुत मुलीचा ठाव ठिकाणा  माहित असून देखील पोलिस शोध घेत नाहीत असा आरोप माता  पित्यांनी केला आहे. उलट याकुब मुल्ला अकलेचे तारे तोडत ," इस्लाममध्ये असं चालतं , मी स्वतः त्या दोघांचा निकाह करून देईन " आम्हालाच सुनावतात असं त्यांचं म्हणणं आहे . या प्रकरणाबद्दल आणि याकुब मुल्लाच्या उद्दामपणा बद्दल  एकनाथराव खडसे यांच्याकडे , महिला आयोग तसेच मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. एकनाथ खडसे यांनी गंभीरपणे जलद चौकशी करण्याचं पत्र दिलं आहे . तरीही पोलिस अधिकारी त्यांचा मुद्दाम शोध घेणं टाळत आहेत. येत्या २१ मे ला त्या मुलीला १८ वर्षे पूर्ण होतील व ती सज्ञान होईल त्यानंतर तिच्याशी विवाह करायचा असा अपहार्ण्कार्त्या नवरोबाचा डाव आहे . तोवर तिला लपवून ठेवले जाणार आहे असे मुलीच्या माता पित्यांनी सांगितले. हतबल झालेल्या पित्याने वरपक्षाला आपण स्वतः लग्न थाटात लावून देऊ पण माझ्या लेकीला मला एकदा पाहुद्या अशी विनवणी देखील परंतु काही उपयोग झाला नाही. याकुब मुल्ला यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते सुट्टीवर आहेत. २१ तारखेला पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जानेवारी महिन्यात पोलिस ठाण्याच्या बाहेरून ती मुलगी त्या मुलासोबत पळून गेली. आम्ही कसोशीने त्यांचा शोध घेत आहोत . गुंडा स्टाफ चे पोलिस अधिकारी नार्वेकर यांची खास नेमणूक केली आहे . या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावू आणि त्या मुलीला पालकांच्या ताब्यात देऊ 
वसंत विष्णू पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages