मुंबई / प्रतिनिधी
गोवंश हत्याबंदी कायदा गरिब व शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने त्वरीत रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गोवंश हत्याबंदी कायद्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येइल असा इशारा रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला. बांद्रा येथे जिल्हाधीकारी कार्यालयावर रिपब्लीकन पक्षाच्या वतीने गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी आठवले बोलत होते. गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे खासदार रामदास आठवले यांनी जाहीर केले.
भाजप प्रणीत महायुती सरकार सोबत रिपब्लीकन पक्ष आहे.मात्र अन्यायकारक कायदा सरकार करत असेल तर आम्ही डोळे बंद करुन बसणार नाही.गोवंश हत्याबंदी कायदा अन्यायकारक आहे.गोवंश हत्याहंदी कायदा रद्द करुन पुर्वीचाच गोहत्याबंदी कायदा पुन्हा लागू करावा यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांवर आर्थीक संकट उभे राहणार आहे.चर्मोद्योगाचे आर्थीक नुकसान होणार आहे.बीफ उद्योगातील कूरेशी आणी खाटीक समाजातील लाखो लोक बेरोजगार होणार आहेत.
गोर गरींबावर अन्याय करणारा कायदा असल्यामुळे गोवंश हत्याबंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लीकन पाने आंदोलन पुकारले आहे असे रामदास आठवले यांनी जाहीर केले.1995 मध्ये तत्कालीन युती सरकारने तयार केलेला गोवंश हत्याबंदी कायद्याला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना यावर्षी मंजुरी दिल्याने हा कायदा राज्यात लागू झाला आहे.त्यामुळे रिपब्लीकन पक्षाच्यावतीने राष्ट्रपतींची भेट घेउन हा कायदा रद्द करावा अशी मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले.
वांद्र्यात म्हाडा कार्यालय ते जिल्हाधीकारी कार्यालय अश्या काढण्यात आलेल्या मोर्चात रिपव्लीकन पक्षासोबत बीफ उद्योगातील बेरोजगार झालेले कामगारही सहभागी झाले होते.या मोर्चाचे जिल्हाधीकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले यावेळा विचार मंचावर रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणास अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष उत्तमराव खोब्रागडे, तानसेन ननावरे, फिरोजअली फारुखी,रईस मौलान कुरेशी, मिलींद रानडे, गौतम सोनावणे उपस्थीत होते.

