मुंबई ९ मे (प्रतिनिधी) - आगामी जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असून त्याबाबत केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळताच मित्र पक्षांना या विस्तारात योग्य तेप्रतिनिधित्व देऊन सामिल केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील मित्रपक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. वांद्रे येथील मित्र पक्षांची बैठकआटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी आपल्या वर्षा यानिवासस्थानी आमंत्रित केले होते. तिथे झालेल्या चर्चेत मित्रपक्षांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
सत्तेत स्थिरस्थावर झाल्यानंतरही महायुतीतील मित्रपक्षांना सत्तेतील वाटा मिळत नसल्यानेसत्तेत राहायचे किंवा नाही याबाबतची रणनिती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मित्रपक्षांनीसत्तेतल्या सहभागाबाबत ठाम भुमिका घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाच्या नेत्यांना चर्चेचे आमंत्रण दिले. या चर्चेदरम्यान मित्रपक्षांच्या वतीने तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.तसेच सत्तेतील वाटा मिळत नसल्याने कार्यकर्त्यांच्या स्तरावरील पक्षांतर्गत अस्वस्थेतेचीकल्पना दिली. सत्ता असूनही आपल्या मतदारसंघातील कामे होत नाहीत, किंवा केंद्रीय आणि राज्य स्तरावरील विकासकामांचा निधीही उपलब्ध होत नसल्याबद्दलही मित्रपक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीतील सर्व पक्षांचा समन्वय राखण्यासाठी लवकरच सहाही पक्षांची एक समन्वय समिती स्थापन केली जाईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर सत्तेतल्या सहभागाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणालेकी, येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी जुलैमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा सुरू असून केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व मित्रपक्षांना सामावून घेतले जाईल असेही ते म्हणाले.

