सत्तेतला किमान दहा टक्के वाटा द्या, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल - महायुतीतील मित्रपक्षांची ठाम भुमिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सत्तेतला किमान दहा टक्के वाटा द्या, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल - महायुतीतील मित्रपक्षांची ठाम भुमिका

Share This
मुंबई :  मे - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपने केंद्रात आणि राज्यातील सत्तेत दहा टक्के वाटा देण्याच्या दिलेल्या लेखी आश्वासनाचा त्यांना आता विसर पडला आहेमात्रभाजपने मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळावासध्या तरी सरकारचा पाठिंबा काढण्याचाकोणताही विचार आम्ही केलेला नाहीमात्र सत्तेचा योग्य तो वाटा मिळणार नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेलअशी भुमिका रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सर्व मित्रपक्षांच्या वतीने जाहीर केलीआज मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महायुतीतील मित्र पक्षांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता स्थिरस्थावर झाल्यानंतरही निवडणुकीपुर्वी आपल्यालाकबुल केल्याप्रमाणे सत्तेतला वाटा देण्यास भाजप टाळाटाळ करत असल्याने सरकारसोबतराहायचे की नाही याबाबतची भुमिका ठरवण्यासाठी आज मुंबईत रिपाईस्वाभिमानीशेतकरी संघटनाराष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या संघटनांच्या नेत्यांची बैठक पार पडलीसरकारला सत्तेवर आणण्यात आपला वाटा महत्वाचा होतात्यामुळे आता सत्तेत आल्यानंतर सत्तेतील योग्य वाटा मिळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबतची विस्तृत चर्चा या बैठकीत करण्यात आलीया बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिपाईचे अध्यक्ष आणि या बैठकीचे समन्वयक मारामदास आठवले यांनी चारही मित्र पक्षांची भुमिका स्पष्ट केलीआमची सरकार विरोधाची भुमिका नाही.मात्र भाजपने दिलेली लेखी आश्वासने पाळली पाहिजेतमित्रपक्षांपैकी चार जणांना मंत्रीपदे , विविध महामंडळे आणि शासकीय समित्यांमध्येही योग्य ते प्रतिनिधीत्व मिळावे अशी आमची अपेक्षा आहेअसे ते म्हणाले.आपण सरकारला याबाबत काही डेडलाईन देत आहात काअशी विचारणा मारामदासआठवलेंना केली असता ते म्हणाले की, "सध्या तरी डेडलाईन नाही पण सरकारलालाईफलाईन देण्याचा विचार आहे. ' याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही मा. आठवले यांनी सांगितले.

तर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आपापसातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुतीतील सहाही पक्षांच्या प्रतिनिधींची एक समन्वय समिती नेमण्याची मागणी केलीआपण दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या शब्दाखातर महायुतीत सामिल झालो होतो. अशा स्थितीत त्यांची कमतरता आम्हाला जाणवत असल्याचे मा. शेट्टीम्हणाले. मित्र पक्षांना सत्तेतला वाटा देण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचे भाजप नेतेसांगतातमात्र आश्वासने देताना भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांना विचारले होते कायअसासवाल करत माखासदार शेट्टी म्हणाले कीयापुढे आम्ही भाजपमध्ये ज्यांना निर्णयाचे अधिकार आहेत अशा व्यक्तीशी चर्चा करूआता विचार करण्याऐवजी शब्द देताना विचार करावयास हवा होता असा टोलाही माशेट्टी यांनी भाजपला लगावलायाशिवाय भाजपला फक्त पाच वर्षांचे राजकारण करायचे आहे काकिंवा त्यांना मित्र पक्षांना काही द्यायचे नसेल तर त्यांनी स्पष्टपणे तसे सांगावेअशा स्पष्ट शब्दात शेट्टी यांनी मित्रपक्षांच्या वतीने बाजूमांडली.

रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनीही मित्रपक्षांशी भाजप जी वर्तणुक करत आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केलीआमचे लोक भलेही निवडून आले नसतील मात्र आमच्या किमान ५ टक्के मतांमुळे तुमचे अनेक उमेदवार निवडून येऊ शकले याची जाणभाजपने ठेवावीअसेही त्यांनी यावेळी सांगितलेआम्ही सत्तेसाठी दबाव टाकतो आहोत अशी आमच्यावर टीका केली जाते पण मग तुमचा अट्टहाससुद्धा सत्तेसाठीच आहे ना असा उपरोधिक सवालही त्यांनी केलातर सत्तेचा कोणताही लाभ आम्हा मित्र पक्षांना झाला नसल्याचे सांगत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माविनायक मेटे म्हणाले कीआमच्याकार्यकर्त्यांनाही सत्तेत सामावून घेणे गरजेचे आहेत्यासाठी भाजपने आमच्याशी चर्चा करणेगरजेचे आहेसरकार आणण्यात आमची भुमिका मोलाची होतीत्यामुळे आता सत्ता आल्यावरही आपण एकत्र असले पाहिजेअसे सांगत त्यांनी सत्तेतल्या दहा टक्के वाट्याच्या मित्रपक्षांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

या बैठकीत रिपाईच्या वतीने अध्यक्षरामदास आठवलेअविनाश महातेकरतानसेन ननावरे हे उपस्थित होतेतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोतरविकांत तुपकरमावर्षा काळेरमेश भोसकर आणि योगेश पांडे हे मान्यवर सहभागी झाले होतेराष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महादेव  जानकरबाळासाहेब रोडटक्के, दशरथ राऊत आणि अजित पाटील आदी नेते उपस्थित होतेतर शिवसंग्रामच्या वतीने अध्यक्ष विनायकराव मेटेतानाजीराव शिंदेरमेश आंब्रेविक्रांत आंब्रेविनोद साबळे आणि राजेंद्र म्हस्के आदी नेतेमंडळी उपस्थित होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages