अग्निशमन दलाची दैनावस्था - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दलाची दैनावस्था

Share This

शनिवारी ( ९ मे २०१५ ) दुपारी साडेचारच्या सुमारास मुंबईच्या काळबादेवी येथील गोकुळ निवास भागातील ३३ क्रमांकाच्या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना या इमारतीला आग लागली. आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी झुंजत असतानाच ही इमारत कोसळून काही कर्मचारी ढिगा-याखाली सापडले. यापैकी एस. जी. अमीन आणि एस. डब्लू. राणे यांना बाहेर काढण्यात आले असून, इतरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २२ गाडया घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. आग विझवताना गंभीर जखमी झालेले मुख्य अग्निशमन दल अधिकारी सुनिल नेसरीकर हे ४० टक्के भाजल्याने व उप अग्निशमन अधिकारी अमीन हे ८० टक्के भाजल्याने त्यांना जवळच्या मसिना व नंतर त्यांना ऐरोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सहाय्यक अग्निशमन अधिकारी एस. डब्लू. राणे व स्टेशन अधिकारी एम. एन. देसाई हे अधिकारी आग लागलेल्या इमारतीचा काही भाग कोसळल्याने त्या ढिगाऱ्या खाली अडकले होते.  त्यांना वाचवण्यात यश आलेले नाही संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई शहीद झाले आहेत.

काळबादेवी परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती आणि अरुंद जागांमुळे अग्निशमन दलाला इमारतीपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत होते. तरीही अथक प्रयत्न करत अग्निशमन दलाच्या आठ गाडया आणि सात पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. काळबादेवी येहे लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नसली तरी सात जखमी झाल्याचे समजते. मुंबई मध्ये आग लागणे काही नवीन नाही. परंतु आग विझवताना अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी आग विझवताना भाजने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली घाडले जाणे हे मात्र विचार करण्यासारखी बाब आहे. असाच प्रकार एक वर्षा पूर्वी अंधेरीच्या लोटस बिझनेस पार्क या २२ मजली इमारतीला लागलेली आग विझवताना झाला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी जवळपास सहा तास आगीशी झुंज देत होते. या आगीमध्ये गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना नवी मुंबईतील एरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 20 जवानांना विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.     
आग आटोक्‍यात आणण्यासाठी मुंबई अग्निशामक दलाचे 33 जवान इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेले होते. आग नेहमी वरच्या बाजूला पसरत जाते परंतू इमारतीमध्ये आत इलेक्ट्रिकच्या वायरीनी पेट घेतल्याने आग वरच्या मजल्यावरून खाली पसरत गेली. अचानक 20 व्या मजल्यावरून आगीचा भडका उडाला. त्यामुळे हे सर्व जवान २१ व्या मजल्यावर अडकले. त्यातील नितीन इवलेकर यांच्यासह काही जवान मोठ्या धैर्याने वरच्या मजल्यावर गेले. मात्र, थोड्या वेळात तेथेही आग पसरू लागल्यामुळे अग्निप्रतिबंधक गणवेश असतानाही आगीच्या ज्वाळांनी घेरल्याने नितीन इवलेकर या जवानाचा मृत्यू झाला होता. आगी इतकी भयानक होती कि या आगी मध्ये पाण्याचा फवार मारणारा पाईप, जवानांचे हातातील मोजे आणि पायातील गमबूट सुद्धा वितळले होते. आगी जुन्या घटनां पासून अग्निशमन अग्निशमन अधिकाऱ्यांनी बोध घ्यायला हवा होता. परंतू जुन्या घटनां पासून अग्निशमन अधिकारयानी कोणतीही कारवाई केली नसल्याने शनिवारी काळबादेवी येथील आगीत अग्निशमन दलाचे अधिकारी आगी मुळे गंभीर जखमी झाले आहेत. 
अंधेरी येथील आगी वेळी अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. अंधेरी येथील आगी मध्ये पाण्याचा फवार मारणारा पाईप, जवानांचे हातातील मोजे आणि पायातील गमबूट सुद्धा वितळले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीशी झुंज देण्यसाठी एका विशिष्ट प्रकारचा सूट दिला जातो असा सूट असतानाही कित्तेक जवान आगी मध्ये होरपळून निघाले होते. यावेळी पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. काळबादेवी येथील आगी मध्ये ७ जन जखमी  झाले आहेत. यामध्ये २ अग्निशमन अधिकारीसुद्धा आहेत. दोघे अधिकारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी असलेले सुनील नेसरीकर यांचा चेहरा जळाला आहे व उप अग्निशमन अधिकारी अमीन हे ८० टक्के भाजले आहेत. संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई शहीद झाले आहेत. सूट निकृष्ट दर्जाचा असल्याचा व सूटच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा वेळोवेळी आरोप झाले आहेत. आग विझवताना कर्मचारी आगी मध्ये होरपळून निघत असल्याने हे आरोप खरे आहेत असे मानावे लागेल. 
अंधेरी येथील आग विझवताना नितीन इवलेकर यांचा मृत्यू झाल्यानंतर जे प्रश्न उपस्थित झाले होते. तेच प्रश्न पुन्हा संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई शहीद झाल्यावर उपस्थित होत आहेत. आग विझवताना आग रोधक सूट अग्निशमन दलाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना दिला जातो. तो सूट या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता का ? विशेष असा सूट न घालता हे अधिकारी आग विझवण्यासाठी गेले होते का ? परदेशात आग विझवताना अग्निशमन दलाचे अधिकारी चेहरा आणि डोके आगी पासून वाचवण्यासाठी विशेष असे हयाल्मेट घालतात, अशी हयाल्मेट मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी अधिकाऱ्यांना देण्यात आली होती का ? सुट आणि हयाल्मेट देण्यात आली असल्यास अधिकारी आगी मध्ये जखमी कसे झाले ? या प्रश्नांची उत्तरे अग्निशमन दल आणि मुंबई महानगर पालिकेने द्यायलाच हवीत. 

अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचारी आपला जीव मुठीत घेवून मुंबईकर नागरिकांना आगी सुरक्षीत ठेवण्याचे काम करत असतात. नागरिकांच्या जीवाची काळजी अग्निशमन दलातील कर्मचारी, अधिकारी घेतात मात्र याच अधिकारी कर्मचाऱ्यांकडे अग्निशमन दल आणि मुंबई महानगर पालिका मात्र दुर्लक्ष करत आहे. लोकांचे जीव वाचवण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सुरक्षा नसेल तर ते इतरांची सुरक्षा कशी करतील हा प्रश्न आहे. पालिकेचा प्रत्तेक विभाग हा कमिशन आणि टक्केवारी मध्ये अडकला आहे. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना लागणारे सूट असो किंवा इतर काही वस्तू असोत टक्केवारी आणि कमिशन मुळे निकृष्ठ दर्जाच्या विकत घेतल्या जात आहेत असा थेट आरोप होत आहे. टक्केवारी आणि कमिशन मुळे अग्निशमन दलाचीही दैनावस्था झाली आहे. इवलेकर सारख्या कर्मचाऱ्याचे मृत्यू झाले.  नेसरिकर आणि  अमीन सारखे अधिकारी आगी मध्ये होरपळून जखमी झाले. संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई शहीद झाले आहेत. तरीही अग्निशमन दल आणि मुंबई महानगर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणार असेल तर हि शोकांतिकाच म्हणावी लागेल.

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages