विशेष मुलांचे प्रशिक्षण केंद्र पालिका रिकामे करणार नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2015

विशेष मुलांचे प्रशिक्षण केंद्र पालिका रिकामे करणार नाही

मुंबई : महानगरपालिकेच्या शाळांच्या आवारात विशेष व मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलांसाठी सुरू करण्यात आलेले प्रशिक्षण केंद्र रिकामे करण्यात येणार नाही, असे आश्‍वासन आयुक्त अजॉय मेहता यांनी आ. मंगलप्रभात लोढा यांना दिले. याबाबतचे आदेश तत्काळ जारी करण्यात येणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत अनेक शिक्षण संस्था आहेत; परंतु विशेष मुलांसाठी असणार्‍या शाळा बोटावर मोजता येतील एवढय़ा आहेत. विशेष मुलांना अध्यापन देणार्‍या शिक्षकांची कमतरता आणि इतर कारणामुळे विशेष मुलांच्या शाळांची संख्या कमी आहे. या विशेष मुलांचा मानसिक स्तर वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मनपाच्या शाळांमध्ये सामाजिक संस्थांना जागा देण्यात आली आहे; परंतु मनपाने काही महिन्यांपूर्वी आदेश जारी करून संबंधित संस्थांना शाळेतील जागा रिकाम्या करण्याचे आदेश दिले होते. यामुळे विशेष मुलांची आणि पालकांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली होती. विशेष मुलांचे प्रशिक्षण केंद्र चालवणार्‍या 'क्षितिज' या संस्थेने आ. लोढा यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. आ. लोढा आणि 'क्षितिज'संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाने या मुद्दय़ावर आयुक्त अजॉय मेहता यांची नुकतीच भेट घेतली.

Post Bottom Ad

JPN NEWS