मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांची लूट रोखण्यासाठी 'प्रीपेड कूपन्स' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2015

मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांची लूट रोखण्यासाठी 'प्रीपेड कूपन्स'

मुंबई : मेल-एक्स्प्रेसमध्ये पदार्थांच्या दरावरून प्रवाशांची ठेकेदारांकडून होणारी लूट रोखण्यासाठी 'प्रीपेड कूपन्स' योजनेची सुरुवात करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे, असे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी पत्रकारांना सांगितले. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांतील ठेकेदार प्रवाशांकडून ठरलेल्या दरांपेक्षा जादा दर आकारत आहेत, असे महाव्यवस्थापकांनी मान्य करताना, ते रोखण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असा दावा सूद यांनी केला.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये खानपान सेवेसाठी नेमलेले ठेकेदार ठरलेल्या दरांपेक्षा जास्त दराने पैसे आकारत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, रेल्वेने त्यांना प्रवाशांना देयके देण्यासाठी 'हँड हेल्ड मशीन्स' दिली. मात्र, या मशीन्सचा ते वापर करतच नसल्याचे आढळले आहे. यामुळे हे ठेकेदार प्रवाशांना नाडतच आहेत. त्याच्याही तक्रारी रेल्वेकडे येत असल्याने यावर 'प्रीपेड कूपन्स'चा उपाय शोधला जात आहे, असे ते म्हणाले. ठरलेल्या दरांपेक्षा जास्त दराने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जात असून खाद्यपदार्थही अवाच्या सव्वा दराने विकले जात आहेत, याचा दोष महाव्यवस्थापकांनी प्रवासी आणि ठेकेदारांनाच दिला. ठेकेदाराने जास्त दराने पाण्याची विकल्यास ग्राहकाने ते खरेदी करता कामा नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS