तलाव क्षेत्रात जुलै अखेर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा - मुंबईकरांवर पाणी कपातीची तलवार नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तलाव क्षेत्रात जुलै अखेर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा - मुंबईकरांवर पाणी कपातीची तलवार नाही

Share This
मुंबई (पतिनिधी ) -मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  सात तलाव क्षेत्रात जुलै अखेर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाऊस थोडा उशीरा पडला तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.पाऊस पडेपर्यंत पाणी कपात नाही. पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 


मुंबईला तानसा ,मोडक सागर, तुळशी , विहार , भातसा , आणि मध्य वैतरणा या सात  तलावातून दररोज 3750 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो सध्या या सहाही तलाव क्षेत्रात 3 लाख 66 हजार 289 दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे. जुलै अखेर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाऊस थोडा उशीरा पडला तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तसेच पावसाळा पडेपर्यंत तरी  पाणी कपात केली जाणार नाही असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. 

त्यामुळे यंदा पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही पालिका जल विभागाने आज र-थायी समितीच्या बैठकीत अहवाल सादर केला त्या अहवालावरून पष्ट होत आहे सध्या तानसा तलावात  34124  , मोडक सागर तलावात 36152 , विहार मध्ये 3204 , तुळशी 2849 , भातसा 139113 , मध्यवैतरना 137557 आणि उच्चर-तर  वैतरणा 13290  असा एकूण 366289 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. यंदा तलाव क्षेत्रात समाधानकारक पाणी साठा असून पाऊस ही लवकर पडण्याची ,शकता हवामान खात्याकडून वतॅवण्यात येत आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages