परिवहन विभागाच्या तोट्यामुळे बेस्टचे अर्थसंकल्पीय अंदाज फोल ठरले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परिवहन विभागाच्या तोट्यामुळे बेस्टचे अर्थसंकल्पीय अंदाज फोल ठरले

Share This
मुंबई : परिवहन विभागाच्या तोट्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या अर्थसंकल्पात मांडलेले अंदाज पूर्णपणे फोल ठरले आहेत, अशी तक्रार बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. बेस्टचा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाचा अंदाज आणि प्रत्यक्षात मिळणार्‍या रकमेतील तफावत मोठी आहे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. यासाठी बेस्ट प्रशासनाने योग्य ती प्रणाली राबवावी, असेही सदस्यांनी सुचवले.
बेस्टच्या अर्थसंकल्पात विद्युत आणि परिवहन विभागासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाते. या दोन्ही विभागांकडून वर्षभरात मिळणार्‍या उत्पन्नाचा आढावा घेण्यात येतो. पण गेल्या वर्षी या दोन्ही विभागांकडून सादर केलेले अंदाजपत्रक कोलमडल्यामुळे बेस्टच्या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. परिवहन आणि विद्युत विभागाकडून अंदाजे अपेक्षित असलेल्या उत्पन्नापेक्षा २५0 कोटी रुपयांचा तुटवडा जाणवत आहे, असे या चर्चेत सांगण्यात आले. एप्रिल २0१४ ते मार्च २0१५ या कालावधीत बेस्टच्या विद्युत विभागाचे उत्पन्न चार हजार ८२२ कोटींपेक्षा जास्त असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण त्यात सुधारणा करून चार हजार ८३९ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र या विभागास चार हजार ६९६ कोटी उत्पन्न मिळाल्यामुळे विद्युत विभागास १४३ कोटी रुपये अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळाले.

परिवहन विभागाला एक हजार ६0४ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे अपेक्षित असताना या वर्षी परिवहन विभागास एक हजार ५२३ कोटी रुपये मिळाल्यामुळे २00 कोटींचा महसूल मिळालाच नाही. ही रक्कम सुधारित अंदाजापेक्षा ८३ कोटींनी कमी आहे. यामुळे परिवहन आणि विद्युत विभागास ८३ कोटी रुपये कमी रक्कम मिळाली. विद्युत आणि परिवहन विभागाचे एकत्रित उत्पन्न मिळूनही २४९ कोटी रुपये कमी मिळाले, याबद्दल शिवसेनेचे बेस्ट समिंतीमधील सदस्य सुनील गणाचार्य यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. आर्थिक उत्पन्नाचे अंदाज काही कोटींनी चुकत असेल तर काही आक्षेप नाही पण इतक्या प्रचंड प्रमाणात अंदाज चुकत असल्यास ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले. यावर गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages