भुलाभाई देसाई रोडवरील 'पे अँड पार्किंग'चा ताबा घेण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2015

भुलाभाई देसाई रोडवरील 'पे अँड पार्किंग'चा ताबा घेण्याची मागणी

मुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील 'पे अँड पार्किंग'मध्ये अनियमितता आढळली असून, तेथे पार्किंगच्या बाजूला हुक्कापार्लर राजरोसपणे चालवला जात आहे. पालिकेसमवेत केलेल्या मक्ता कराराचेही उल्लंघन झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करताना हे पे अँड पार्किंग पालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. 

सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी याविषयी हरकतीचा मुद्दा काढून ही मागणी केली. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या पार्किंगची अचानक पाहणी केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी येथे 'पालिका पार्किंग'चा फलक लावला आहे. याच पार्किंगच्या बाजूला असलेल्या इमारतीमधील चार हॉटेलमध्ये हुक्कापार्लर चालतो. त्यामागे पालिकेच्या अधिकार्‍यांचा हात आहे. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विश्‍वासराव यांनी केली. 'या पार्किंगबद्दल प्रशासन जाणूनबुजून माहिती देत नसल्याने त्यांचीही चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आणि सत्ताधारी पक्षांनी केली. या हुक्कापार्लरसंबंधी स्थायी समितीच्या पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला दिले व हरकतीच्या मुद्यावरील निर्णय राखून ठेवला.

Post Bottom Ad

JPN NEWS