मुंबई : मुंबईतील नाल्यांच्या सफाईच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. समितीच्या बैठकीत सदस्यांनी नालेसफाईवर चर्चा घडवून आणली, त्या वेळी ही मागणी करण्यात आली. २७ मेपर्यंत नालेसफाई ९२.७२ टक्के झाली आहे, तर मिठी नदीची सफाई ९१.४0 टक्के झाली आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. पावसाळा आठ दिवसांवर आला आहे. ठेकेदार नाल्यातील गाळ कुठे टाकतात हे पाहण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे, असे भाजपाचे गटनेते मनोज कोटक म्हणाले. तर नालेसफाई किती झाली आहे व ही सफाई कधीपर्यंत सुरू राहणार आहे, अशी विचारणा सदस्यांनी प्रशासनाला केली.
Post Top Ad
30 May 2015
Home
Unlabelled
नाल्यांच्या सफाईवर देखरेखीसाठी सीसीटीव्हीची मागणी
नाल्यांच्या सफाईवर देखरेखीसाठी सीसीटीव्हीची मागणी
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

