'नाईटलाईफ'पेक्षा 'लाँड्री' चांगलीच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2015

'नाईटलाईफ'पेक्षा 'लाँड्री' चांगलीच

मुंबई : मुंबईत 'नाईटलाईफ' सुरू करण्याच्या चर्चेऐवजी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश धुलाईसाठी 'लाँड्री' सुरू करणे केव्हाही चांगलेच, असा टोला पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी शिवसेनेला लगावला आहे. भाजपाकडे संस्कृती असल्यानेच लाँड्रीसारखे उपक्रम सुरू करत असल्याचे तावडे यांनी सांगितले 

पालिका विद्यार्थ्यांच्या गणवेष धुलाईसाठी पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी शाळांमध्ये लाँड्री सुरू करण्याची योजना जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी त्याला विरोध दर्शवून, पालिका शाळांचा 'धोबीघाट' करायचा आहे का, असा सवाल केला होता. या योजनेला शिवसेनेचा विरोध आहे, याकडे तावडे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, शिवसेनेने विरोध केला असला तरी, ही योजना होणारच अशी भूमिका तावडे यांनी घेतली आहे. आमची युती असल्याने ते कसे विरोध करतील, असा प्रतिप्रश्न तावडे यांनी केला आहे.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS