काळबादेवी दुर्घटनेमुळे मनोधैर्य खचू देऊ नका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2015

काळबादेवी दुर्घटनेमुळे मनोधैर्य खचू देऊ नका

मुंबई : काळबादेवी घटनेने खचून जाऊ नका तसेच मनोधैर्यही खचू देऊ नका आणि धीर सोडू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे भावनिक आवाहन पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत केले.

आयुक्तांनी मंगळवारी सकाळी १0 वाजता त्यांच्या दालनात अग्निशमन दलाच्या उपप्रमुखांची बैठक आयोजिली होती. त्या वेळी ते बोलत होते. सुमारे दोन तासांच्या या बैठकीत आयुक्तांनी प्रत्येक अधिकार्‍याकडून अग्निशमन दलाच्या समस्या जाणून घेतल्या. दलात कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत याविषयीदेखील त्यांनी माहिती जाणून घेतली. पालिका प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही खंबीर राहून धीर सोडता कामा नये, असे आवाहन त्यांना केले, अशी माहिती एका अग्निशमन अधिका-याने दिली

Post Bottom Ad

JPN NEWS