मुंबई : राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २0१५ या नवीन वर्षात लाचखोरांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरूकेली असून गेल्या चार महिन्यांमध्ये या विभागाने सापळा रचून कारवाई केली. तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमावणारे व इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील एकूण ४३५ गुन्ह्यांत ४४४ लाचखोर लोकसेवकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक महसूल विभाग तसेच गृह विभागातील (पोलीस) लाचखोरांचा समावेश असून त्याखालोखाल ग्रामविकास, नगरविकास आदी विभागांतील लाचखोरांचा यात समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षातील पहिल्या चार महिन्यांत केलेल्या कारवाईच्या तुलनेत या वर्षी ६६ कारवाया अधिक केल्याने या विभागाच्या कारवाईत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा लाचखोरांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. लाचलुचपत विभागाने गेल्या चार महिन्यांमध्ये केलेल्या सापळा कारवाईत ४१६ लाचखोरांना पकडले आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमावणारे व इतर भ्रष्टाचार प्रकरणांतील १९ अशा एकूण ४३५ लाचखोरांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ८ कोटींची मालमत्ता हस्तगत करण्याची कारवाई केली आहे. लाचलुचपत विभागाच्या गेल्या चार महिन्यातील कारवाईत वर्ग-१चे २७, वर्ग-२चे ६0, वर्ग-३चे ३३८, वर्ग-४चे १८, इतर लोकसेवक २२, खाजगी व्यक्ती-७३ असे एकूण ५३८ लाचखोर सापळ्यात अडकले आहेत. तर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमावणार्यांमध्ये वर्ग-१चे १२, वर्ग-२चे २, वर्ग-३चे ३, वर्ग-४चा १, इतर लोकसेवक ३ तर खाजगी व्यक्ती १0 अशा एकूण ३१ व्यक्तींचा समावेश आहे.
या चालू वर्षामध्ये सापळा कारवाईत सर्वाधिक महसूल विभागातील १३३, गृह विभाग (पोलीस)-११४, ग्रामविकास-६६, नगरविकास-३६, राज्य वीज वितरण कंपनी-२९, आरोग्य विभाग-१६, शिक्षण विभाग-१८, वन विभाग-१७, सहकार व पणन विभाग-१0, पाटबंधारे विभाग-५ आदी विभागातील लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. यात पोलीस ९७, तलाठी- ५४, इंजिनीयर-२६, शिक्षक-१८, डॉक्टर-९, अभियोक्ता (वकील)-३, नगरसेवक/महापौर-२, सरपंच-३, सभापती/ नगराध्यक्ष-३, त्याचप्रमाणे ३५ महिला लोकसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. या चालू वर्षामध्ये सापळा कारवाईमध्ये वृद्ध, महिला, अपंग, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या वर्गवारीतील एकूण ७0 तक्रारदारांकडून आलेल्या तक्रारीवर एकूण ८३ लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली.
'सापळा कारवाईप्रमाणेच नवीन मोबाइल अँप्सद्वारे पदाचा दुरुपयोग' या सदराखाली-४0, अपसंपदा-९, व लाचेच्या मागणीच्या-९ अशा एकूण ५८ तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्या असून या प्रकरणातील संबंधित अधिकार्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मोबाइल अँप्सप्रमाणेच १0६४ या हेल्पलाइनवर आतापर्यंत ५१४१ कॉल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाले असून या कॉलच्या माध्यमातून मुंबई-४, पुणे परिक्षेत्र-५, नागपूर परिक्षेत्र-२८, अमरावती परिक्षेत्र-३, औरंगाबाद परिक्षेत्र-६ अशा एकूण ४६ लाचखोरांना देखील पकडण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. चालू वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईमध्ये दोष सिद्ध होण्याचे प्रमाण २२ टक्के इतके असून गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी दोष सिद्धीच्या प्रमाणात ५0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तब्बल ३४३५ प्रकरणे राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. दरम्यान, नागरिकांना भ्रष्टाचारी लोकसेवकाविरोधात तक्रार असल्यास त्यांनी १0६४ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा अथवा https://www.facebook.com/MaharashtraACB फेसबुक अकांऊंटवर तसेच http://acbmaharashtra.gov.in/ वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.